Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 329 नवे पॉझिटिव्ह तर 19 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थोडयाफार प्रमाणात कमी होत असल्याना समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 329 नवे पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात कोरोनामुळं पुणे शहरातील 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 4 जणांचा दिवसभरात मृत्यू झाला आहे. दिवसभरात 774 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 4105 जणांचा बळी गेला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 59 हजार 406 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1 लाख 48 हजार 416 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.सध्या पुणे शहरातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या 6 हजार 885 एवढी आहे. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 685 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 366 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत.