Coronavirus : नवी हेल्पलाईन – ईमेल आयडी, ‘कोरोना’वर आरोग्य मंत्रालयाची नवीन महिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणूचे प्रमाण सतत वाढत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 131 रुग्ण आढळले आहेत. सोमवारी कर्नाटक, केरळ, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमधून काही नवीन प्रकरणे नोंदली आणि आणि त्यामुळे पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढली. केंद्र आणि राज्य सरकारकडून लोकांना सतत माहिती दिली जात आहे आणि गर्दी असणाऱ्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सोमवारी आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूसंदर्भात काही नवीन अपडेट जाहीर केले आहेत, त्यामध्ये हेल्पलाइन नंबर, ईमेल आयडी यांचा समावेश आहे.

– केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नवीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. 1075 वर 24 तास कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल.

– टोल फ्री क्रमांकाव्यतिरिक्त, एक ईमेल आयडी देण्यात आला आहे, ज्यावर माहिती दिली जाऊ शकते. [email protected]

– नव्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीनुसार युएई, कतार, ओमान, कुवेत येथून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला 14 दिवस देखरेखीखाली ठेवावे लागेल. हा आदेश 18 मार्चपासून लागू होईल.

– युरोपियन युनियन, युरोपियन मुक्त व्यापार संघटना, तुर्की, युनायटेड किंगडम या देशातील नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. 18 मार्चपासून लागू झालेला हा आदेश पुढील अधिसूचनेपर्यंत लागू राहील.

पंतप्रधान मोदींनी सूचना मागवल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सोशल मीडियावर लोकांच्या सूचना मागवल्या. पीएम मोदी म्हणाले की तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना विषाणूचा कसा सामना करता येईल हे लोकांनी सुचवावे. लोक mygov.in वर जाऊन त्यांचे म्हणणे मांडू शकतात. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लोकांना आवाहन केले होते की असे कोणतेही काम करू नका जेणेकरून दुसर्‍या एखाद्याला त्रास सहन करावा लागेल.

सोमवारी भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले. आतापर्यंत देशात 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, देशात या विषाणूमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील बर्‍याच राज्यांत शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, मॉल्स बंद आहेत. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.