Coronavirus : देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 5.08 लाख, गेल्या 24 तासात 18552 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 5,08,953 वर पोहोचली आहे. शनिवारी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 18,552 रुग्णांची संख्या वाढली तर 384 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 10,244 लोक बरे झाले आहेत. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत देशभरात 79,96,707 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 2,20,479 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सध्या देशात 1,97,387 सक्रिय प्रकरणे, 2,95,880 लोकांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून 15,685 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत चाचणी केलेल्या एकूण नमुन्यांपैकी 5,08,953 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशा परिस्थितीत देशात सकारात्मकतेचे प्रमाण 8.41 टक्के आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांची संख्या आणि डिस्चार्ज केलेल्या लोकांमध्ये 98,493 प्रकरणांचा फरक आहे.

महाराष्ट्रात दीड लाखांपेक्षा जास्त तर यूपीमध्ये 20,000 पेक्षा जास्त प्रकरणे

मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 72, आंध्र प्रदेशात 11,489, अरुणाचल प्रदेशात 172, आसाममध्ये 6607, बिहारमध्ये 8716, चंडीगडमध्ये 425, छत्तीसगडमध्ये 2545, दादरा नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 163, दिल्ली येथे 77,240, गोवा येथे 1039, गुजरातमध्ये 30,095, हरियाणामध्ये 12,884, हिमाचल प्रदेशात 864, जम्मू-काश्मीरमध्ये 6762, झारखंडमध्ये 2290, कर्नाटकमध्ये 11,005, केरळमध्ये 3876, लडाखमध्ये 946, मध्य प्रदेशात 12,798, महाराष्ट्रात 1,52,765, मणिपूरमध्ये 1075, मेघालयमध्ये 47, मिझोरममध्ये 145, नागालँडमध्ये 371, ओडिशामध्ये 6180, पुडुचेरीमध्ये 502, पंजाबमध्ये 4957, राजस्थानमध्ये 74,622, तेलंगणात 12,349, तामिळनाडूमध्ये 74,622, सिक्किममध्ये 86, त्रिपुरामध्ये 1325, उत्तराखंडमध्ये 2725, उत्तर प्रदेशात 20,943 आणि पश्चिम बंगालमध्ये 16,190 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. तसेच शनिवारी 8023 प्रकरणे पुन्हा राज्यांकडे परत सोपविण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात 65,844 तर उत्तरप्रदेश मध्ये 6730 सक्रिय प्रकरणे

अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये 29, आंध्र प्रदेशात 6145, अरुणाचल प्रदेशात 129, आसाममध्ये 2339, बिहारमध्ये 1896, चंडीगडमध्ये 84, छत्तीसगडमध्ये 618, दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे 122, दिल्लीत 27,657, गोव्यात 667, गुजरातमध्ये 6294, हरियाणामध्ये 4657, हिमाचल प्रदेशात 353, जम्मू-काश्मीरमध्ये 2591, झारखंडमध्ये 635, कर्नाटकमध्ये 3909, केरळमध्ये 1846, लडाखमध्ये 587, मध्य प्रदेशात 2448, महाराष्ट्रात 65,844, मणिपूरमध्ये 682, मेघालयात 4, मिझोरममध्ये 115, नागालँडमध्ये 209, ओडिशामध्ये 1741, पुडुचेरीमध्ये 306, पंजाबमध्ये 1634, राजस्थानमध्ये 3218, तेलंगणात 7346, तामिळनाडूमध्ये 32,808, सिक्किममध्ये 47, त्रिपुरामध्ये 269, उत्तराखंडमध्ये 866, उत्तरप्रदेश मध्ये 6730 आणि पश्चिम बंगालमध्ये 5039 सक्रिय प्रकरणे आहेत.