‘कोरोना’ हा घरात घुसलेला शत्रू, त्याच्यावर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण (Vaccination) करण्यासंदर्भातील याचिकेवर हायकोर्टात (High Court) सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने (High Court) म्हटलं की, कोरोना (Corona) हा आपल्या घरात घुसलेला शत्रू आहे. या कोरोनावर सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) केला पाहिजे. तसेच घरांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) अंथरुणाला खिळून आहेत, त्यांचा जरा मानवतेच्या (Humanity) दृष्टीकोनातून विचार करा, असा सल्ला उच्च न्यायालयाने (High Court) यावेळी दिली.

संजय राउतांचा भाजपवर पलटवार, म्हणाले – ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं’

घरोघरी जाऊन लसीकरण करावं
लोक लसीकरणासाठी बाहेर कधी पडतील याची वाट न पाहता घरांघरांत जाऊन लसीकरण करायला हवं, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोंदवलं आहे.
दक्षिणेतील काही राज्यात हे होऊ शकतं, उत्तर-पूर्वेत होऊ शकतं,
तर मग पश्चिमेकडील राज्यात का होऊ शकत नाही ? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे.

75 वर्षावरील लोकांना बाहेर जाणं अशक्य
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडून लस घेणं शक्य नाही.
त्यामुळे अशा ज्येष्ठ नागिराकांना घरी जाऊन लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका (Petition) उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
उच्च न्यायालायचे वकील ध्रुती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली.

तर अनेकांचे प्राण वाचले असते
मुंबईमध्ये काही बड्या राजकीय नेत्यांना घरी जाऊन त्यांना लस देण्यात आली.
ती कोणी दिली ? महापालिकेने की राज्य सरकारने ? याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे.
याशिवाय आम्ही परवानगी देत असताना BMC नं केंद्र सरकारकडे बोट दाखवून आमची निराशा केली.
वेळीच लस मिळाली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते, असंही न्यायालयाने म्हटले.

शुक्रवारपर्यंत भूमिका स्पष्ट करा
घरांमध्ये जे ज्येष्ठ नागरिक अंथरुणाला खिळून आहेत, त्यांचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करा, असा सल्ला यावेळी न्यायालयाने दिला आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच काय धोरण अवलंबणार हे शुक्रवारपर्यंत स्पष्ट करावं असेही निर्देश दिले आहेत.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण