Coronavirus : कोरोना विषाणू हा जिवंत जीव नाही किंवा तो मरतही नाही : रिसर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जॉन हॅपकिन्स विद्यापीठाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही महत्त्वाचे तथ्ये सांगितली आहेत. यामध्ये कोरोना विषाणूबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि या विषाणूचा संसर्ग टाळण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच संक्रमण होऊ नये यासाठी काय करावे हे देखील सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणू हा जिवंत जीव नाही तर प्रोटीन रेणू (DNA) आहे. हा विषाणू लिपिड म्हणजेच चरबीच्या एका थराने वेढलेला असतो. हा विषाणू जीव नसून प्रोटीन रेणू असल्याने तो मरत नाही तर स्वत:च तो कमजोर होतो. त्याचा कमजोर होण्याची वेळ तापमान, आर्दता आणि सध्याच्या परिस्थिवर अवलंबून आहे. हा विषाणू खूपच अस्थायी आहे.

चरबीचा थर
कोरोना विषाणूला केवळ एकच चीज वाचवू शकते ती म्हणजे चरबी. विषाणूचा बाह्य थर किंवा चरबी ही केवळ त्याला वाचवू शकते. या कारणास्तव साबण किंवा डिटर्जंट हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण यामुळे चरबी कमी होते. यासाठी आपण 20 सेकंद किंवा त्याहून अधिकवेळ आपले हात चोळावेत जेणे करून मोठ्या प्रमाणात फेस तयार होईल. साबणाने हात जास्तवेळ चोळल्याने चरबीचा थर त्यामध्ये मिसळला जातो आणि प्रोटीनचे रेणू पसरले जातात आणि तो स्वात:हून वेगळा होतो. यासाठी 25 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक गरम पाण्याने हात, कपडे आणि इतर वस्तू धुवावेत. गरम पाण्यामुळे जास्त फेस तयार होतो आणि तो अधिक प्रभावी ठरतो. अल्कहोल किंवा कोणत्याही वस्तूमध्ये 65 टक्के अल्कहोल असलेल्या द्रव पदार्थाने कोणतीही चरबी विरघळते. विशेषत: विषाणूच्या पृष्ठभाग किंवा चरबीचा थर नष्ट करतात.

विषाणू पृष्ठभागावर चिकटतो
ऑक्सिजनयुक्त पाणी देखील यासाठी उपयुक्त आहे. कारण ऑक्साईडस विषाणूचे प्रथिने काढून टाकाता. मात्र ते आपल्याला शुद्धव स्वरुपात वापरावे लागते आणि त्यामुळे आपल्या त्वचेला इजा होऊ शकते. बॅक्टेरियाप्रमाणे हा विषाणू जिवंत नसल्याने यावर कोणत्याही जीवाणू नाशकाचा उपयोग होत नाही.

हे करू नका
कधीही वापरलेले किंवा न वापरलेले कपडे, कागद वापरू नका, कारण याच्या पृष्ठभागावर हे विषाणू चिकटलेले असतात. हा विषाणू फॅब्रिक आणि सच्छिद्र वस्तूंवर तीन तास जिवंत राहू शकतो. तर तांब्याच्या पृष्ठभागावरील विषाणू चार तासापेक्षा अधिक वेळ जिवंत राहू शकत नाही. कारण याची आद्रता या वस्तूवर कोरडी पडत असल्यामुळे असे होते.

हा विषाणू पुठ्ठ्यावर 24 तास, धातूंच्या वस्तूवर 42 तास आणि प्लास्टिकवर 72 तास जिवंत राहू शकतो. मात्र आपण कपडे झटकले तर हा विषाणू हवेत उडतो आणि तो हवेमध्ये तीन तास राहू शकतो. तेथून तो आपल्या नाकावाटे शरिरात प्रवेश करू शकतो.

अंधारात जास्तकाळ टिकून राहतो
व्हायरस थंडीत बऱ्यात काळ टिकून राहू शकतो. त्याच व्यतिरीक्त घरात आणि कारमधील एसीच्या वातावरणात जास्त काळ टिकू शकतो. विषाणूला जिवंत राहण्यासाठी आद्रता आवश्यक असते आणि ते बराच काळ टिकून राहतात. जास्त करून ते अंधारात अधिक काळ टिकून राहतात.

या वस्तू वापरल्यावर हात धुवा
म्यूकोसा, फळं, कुलूप, दरवाजाचे नॉब्स, स्विच, रिमोट कंट्रोल, मोबाईल, घड्याळ, कॉम्प्युटर, टीव्हीला स्पर्श केल्यानंतर आपले हात स्वच्छ धूवा. तसेच बाथरूमला जाऊन आल्यानंतर हाथ स्वच्छ धुवा. त्याचप्रमणे हाताची नखे वाढवू नका. वाढलेली नखे काढून टाका.