नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला दिलासा ! ‘त्या’ संशयीत पेशंटची चाचणी निगेटिव्ह

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – उमरी तालुक्यातील एकाला कोरोनाचा संशयास्पद रुग्ण म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात येथे काल सोमवार रोजी दाखल करण्यात आले आहे. त्या रुग्णाचा अहवाल आज मंगळवार (ता.३१) रोजी प्राप्त झाला आसून रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यामुळे नांदेड अजूनही कोरोना मुक्तच आहे.

नायगाव येथील एक ३० वर्षीय तरुण पुणे येथे कामसाठी होता. तो २१ मार्चला पुण्याहून नायगाव येथे आला असता त्याला हातावर शिक्का मारुन होम कोरोनटाईन करण्यात आले, मात्र तो घरात न राहता नायगावाहून सासरवाडीला उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुरवाडी येथे आठ दिवस राहिला मध्यंतरी तो नायगावला अंत्यविधीला जाऊन पुन्हा आला होता, यातच त्याला तीन चार दिवसापासून ताप, सर्दी, खोकला येत होता.

मात्र हा त्रास सोमवार रोजी अधिकच होत असल्याने प्रथम उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, आणि यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते मात्र आज मंगळवार रोजी हा अहवाल प्राप्त झाला आसून रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. त्यानंतर नांदेड मध्ये जनता खुश आहे जिल्ह्यात संक्रमित संशयित आहे ही बाब कळताच अनेक जण घाबरून गेले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता नांदेड जिल्ह्यातील व उमरी परिसरात असणारी जनता आनंदी झाली आहे.

शहरात व जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी लॉक डाऊन दरम्यान लोक बाहेर पडू नये म्हणून सर्व अधिकारी व प्रशासनास सहकार्य करा घराबाहेर पडू नका अशा स्वरूपात सर्व तालुक्यातील जनतेपर्यंत अधिकाऱ्यांकडून माहिती पोहचवली त्यामुळे नांदेड जिल्ह्यात फारच कवचित गरजू बाहेर पडताना दिसून येत आहेत.