Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारनं केली ‘ही’ सूचना, IPL खेळवा पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमध्ये हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोनोचे संकट भारतात आले असून, देशात आतापर्यंत ५० च्या वर लोकांना संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले. दरम्यान, कोरोनाचा फटका भारतातील लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ला बसण्याची शकता आहे.

२९ मार्च पासून आयपीएलच्या च्या १३ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आयपीएल बाबत चर्चा झाल्याचे कळते आहे. राज्य सरकार आयपीएल आयोजनाबाबत सावध असून कोरोनाच्या वाढत्या फैलावाबाबत आयोजकांना काही सूचना केल्याचे कळते. आयपीएल सामने आयोजित करण्यात राज्य सरकारची हरकत नाही पण, हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून तिकीट विक्री न करण्याचा सल्ला आयोजकांना देण्यात आल्याचे कळते.

कोरोनोचा फैलाव संसर्गाने होत असल्याने गर्दी टाळण्याचे आव्हाहन करण्यात येते. आयपीएल सामन्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे लोकांच्या संपर्कात येऊन कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येते. म्हणून तिकीट विक्री न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र आयपीएलवर मोठ्या प्रमाणात अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याची सूचना करण्यात आली नाही. क्रिकेटप्रेमींना स्टेडियम मध्ये सामने पाहता आले नाही तर टीव्ही वरून याचा आनंद घेता येणार आहे.