Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6190 नवे पॉझिटिव्ह तर 127 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासात कोरोनाची (COVID-19) 6190 नवीन प्रकरणं समोर आली आहे.  तर 8241 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 127 लोक कोरोनामुळं दगावले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं (State’s Public Health Department) याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) आता 89.85 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा 2.62 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 16,72,858 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 15,03,050 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 43,837 लोकांनी आपला जीव कोरोनामुळं गमावला आहे. सध्या राज्यात 1,25,418 एवढे कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह ( Active cases) रुग्ण आहेत.

आतापर्यंत झालेल्या 89,06,826 चाचण्यांपैकी 16,72,858 लोकांना (18.78 %) कोरनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या 25,29,462 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. 12,411 कोरोना सेंटरमध्ये दाखल आहेत.

You might also like