Coronavirus : ‘कोरोना’चं थैमान ! अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक तर जगभरात 2,52,675 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    जगभरात कोरोना संसर्गाचा प्रसार २१२ देशात झाला असून संसर्गित रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळं आतापर्यंत २५२,६८२ हुन अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. तर ३,६६०,८२९ अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळतं आहे. तर दुसरीकडे १,२०४,२१० लोक उपचारानंतर झाले आहे.

जगभरात कोरोना संसर्गाचा कहर पाहायला मिळत असून सर्वच देश कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोना संसर्गाने अमेरिकेमध्ये सर्वाधिक ६९,९२५ बळी घेतले आहे. तसंच अमेरिकेत रुग्णांची आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसोबत इटली आणि स्पेन मध्ये या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. या देशांतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेपाठोपाठ इटलीमध्ये २९ हजार ०७९ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा २५ हजार ४२८ वर गेला आहे. फ्रान्समध्ये २५ हजार २०१ तर ब्रिटनमध्ये २८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.

भारतामध्ये कोरोना संसर्गामुळे १,५६८ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर जर्मनीत ६,९९३, रशियात १,४५१, चीनमध्ये ४,६३३ इराणमध्ये ६,२७७ आणि तुर्कीमध्यें ३,४६१ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. जगात कोरोना संसर्गाचा प्रभाव जरी वाढत असला तरी, कोरोना संसर्गाला हरविणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. कोरोना वर यशस्वी मात करणाऱ्यांमध्ये अगदी सोळा दिवसांच्या नवजात बाळापासून ते नव्वदीपार असलेल्या जेष्ठ व्यक्तींचा समावेश आहे. जगभरातील दहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोना संसर्गाला परतावून लावलं आहे. तसंच बाधितांपैकी जवळपास ९७ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर स्वरूपाची लक्षणे नाहीत.

भारतात कोरोना संसर्गाच्या चाचण्यांची संख्या वाढली असून गेल्या २४ तासांत ३९०० नवीन रुग्ण सापडले आहे. तर १०२० जण उपचारानंतर बरे झाले आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २७.४१ टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. देशात एकूण रुग्णांची संख्या ४६,४३३ झाली आहे तर आतापर्यंत १२,७२६ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.