Coronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट जास्त मृत्यू? सरकारने मॅग्झीनचा दावा फेटाळला

नवी दिल्ली : देशात कोरोना (Coronavirus) संसर्गाची लाट कमजोर पडत असल्याचे दिसत आहे परंतु कोरोनाने (Coronavirus) होणार्‍या मृत्यूंचा आकडा अजूनही कमी झालेला नाही.

या दरम्यान एका मॅग्झीनमध्ये (Magazine) दावा करण्यात आला आहे की देशात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा जो आकडा सादर केला आहे, मृत्यूंची संख्या त्यापेक्षा 5 ते 7 पट जास्त आहे.

मात्र, भारत सरकारने मॅग्झीनचा हा दावा फेटाळला आहे.

सरकारकडून सांगण्यात आले आहे की मॅग्झीनने हा निष्कर्ष महामारी शास्त्राच्या पुराव्यांशिवाय केवळ आकड्यांच्या अंदाजावर काढला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणात स्पष्टीकरण देताना मॅग्झीनमध्ये प्रकाशित लेखावर टिका केली आहे,
ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, कोविड-19 मुळे होणारे मृत्यू सरकारी आकड्यांपेक्षा 5 ते 7 पट जास्त आहेत.

सरकारने दि इकॉनॉमिस्टमध्ये प्रकाशित लेखाला निराधार आणि भ्रामक म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मॅग्झीनमध्ये प्रकाशित विश्लेषण महामारी शास्त्राच्या पुराव्यांशिवाय केवळ आकड्यांच्या अंदाजावर आधारित आहे.

सरकारकडून सांगण्यात आले की, मॅग्झीनमध्ये ज्या अभ्यासावरून कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचा अंदाज लावला आहे, ती पद्धत कोणत्याही देशातील मृत्यूदराचा शोध घेण्याची योग्य पद्धत नाही.

यासोबतच सरकारने मॅग्झीनमध्ये ज्या विश्लेषणाचा वापर केला आहे ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

मृत्यूदर कसा काढला याचा उल्लेख नाही

आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, मॅग्झीनमध्ये प्रकाशित लेखात कोरोनाने होणार्‍या मृत्यूंचे विश्लेषण करणार्‍या कोणत्या अभ्यासाचा वापर करण्यात आला आहे, याची माहिती नाही.

तरीही आरोग्य विभागाने शास्त्रीय डाटाबेस सारखे पबमेड, रिसर्च गेट इत्यादीमध्ये इंटरनेटवर संशोधन पत्राचा शोध घेतला परंतु कुठेही अशाप्रकारची माहिती उपलब्ध झाली नाही.

आरोग्य मंत्रालयानुसार, हा अभ्यास तेलंगनामध्ये विमा दाव्यांच्या आधारावर करण्यात आला आहे.

परंतु याचे विश्लेषण केल्यानंतर सुद्धा अशी माहिती मिळत नाही जी मॅग्झीनमध्ये प्रकाशित केली आहे.

सांगलीतील सर्व दुकाने सोमवारपासून सुरूराहणार

उन्हाळ्यात अंडी खावी की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel :  Coronavirus | ministry of health denied claim that number of corona deaths from the coronavirus pandemic