Coronavirus Lockdown : माणुसकीचं दर्शन ! हज यात्रेसाठी जमवलेल्या रक्कमेतून ‘त्यानं’ मजुरांना वाटलं अन्नधान्य

मंगळूर :  पोलीसनामा ऑनलाइन –   खरा तो एकीची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. , या ओळीची प्रचिती मंगळूर शहारत नुकतीच पहायला मिळाली. ५५ वर्षीय अब्दुरेहमान यांनी हजयात्रेला जाण्यासाठी जे पैसे साठविले होते ते पैसे लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आलेल्या गोरगरीब जनतेला दिले, त्यांनी अनेक गरजुंना अन्नधान्यांचे वाटप केले.

अब्दुरेहमान यांचे १ स्वप्न होते ते म्हणजे एकदा तरी हजयात्रेला जाऊन तेथील मक्का – मदिना पहायचा . त्याउद्देशाने ते गेली अनेक वर्षे शेतमजुरी करता करता पैसे साठवत होते. यंदाच्या वर्षी ते हजयात्रेला देखील जाणार होते , परंतु मध्येच आलेला कोरोना व्हायरस त्यामुळे देशात लॉकडाऊन ची स्थिती निर्माण झाली. संपूर्ण भारत या कोरोनाशी दोन हात करत लढत आहे. अशातच लॉकडाऊन मुळे हातावरचे पोट असणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अब्दुरेहमान यांनी स्वतःचे हजयात्रेसाठी जमवलेले पैसे शहरात अडकलेल्या मजूर लोकांसाठी दिले, ज्यांच्या घरातील अन्नधान्य संपले होते अशांसाठी किरणा मालाचे वाटप त्यांनी केले. अब्दुरेहमान म्हणाले कि,लॉकडाऊन काळात आपल्याला सतत १ प्रश्न सतावत होता तो म्हणजे, हातावर पोट असणारे गोरगरिबांचे खाण्यापिण्यावाचून किती हाल होत असतील ? त्यामुळेच मी हजयात्रेसाठी जमवलेल्या पैशातून गोरगरिबांना मदत करण्याचा खारीचा वाटा उचलला. इतकच नाही तर अब्दुरेहमान यांनी गरिबांना गुप्तदान देखील केले त्यांनी नेमकी किती पैशांची मदत केली, हा आकडा कळू दिला नाही.

अब्दुरेहमान यांचा मुलगा म्हणाला , बाबा अनेक दिवसांपासून हजयात्रेला जाण्यासाठी पैसे जमवत होते, प्रत्येकाचे काहींना काही स्वप्न असते तसेच त्यांचे देखील होते, ते म्हणजे हज यात्रेला जाण्याचे , परंतु त्यांनी हि जी मदत केली आहे ती खर्च कौतुकास्पद कामगिरी आहे.

एकंदरीतच सध्या समाजात दुफळी माजवण्याचा उद्देशाने चाललेल्या अनेक घटनांपुढे हि घटना आदर्श ठरत आहे. शेवटी जगात माणुसकी हाच खरा धर्म आहे ते या बातमीतून प्रतीत होते.