शरद पवारांनी केला जितेंद्र आव्हाडांना ‘कॉल’, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन करुन त्यांची चौकशी केली आहे. मंगळवारी आव्हाड यांनीच फेसबुकवर एक पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली. अचानक साहेबांचा फोन आला. जितेंद्र कसा आहेस. मी म्हटले सगळे ठिक आहे साहेब म्हणाले नक्की माझ्यापासून काही लपवत नाहीस ना? मी म्हटले नाही साहेब. त्यांच्या आवाजामध्ये एक माया, आपलेपणा काळजी हे सगळ दिसत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस अधिकार्‍याच्या संपर्कात आल्याने आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. आव्हाड यांच्यासहित अनेक मोठे पोलीस अधिकारी आणि पत्रकारालाही क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. आव्हाड यांच्या संपर्कातील व्यक्तीला करोना झाल्याने आव्हाड यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये आव्हाड यांना कोरोना झालेला नसल्याचे सिद्ध झाले आहे. पत्रकार, त्याचा कॅमेरामॅन, तीन पोलिस शिपाई आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात आले होते. दरम्यान, आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाची करोना चाचणी पार पडली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कळवा-मुंब्रा परिसरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असून, या भागात आव्हाड यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. तसेच तेथील पोलिसांशी संपर्क होता. मागील आठवड्यामध्ये आव्हाड हे पोलिसांबरोबर कळवा मुंब्रा परिसरामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिकांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान केले होते.