Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात गुरूवारपेक्षा कमी आढळून आले नवे कोरोना पॉझिटिव्ह मात्र दिवसभरात 10 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    पुण्यात गेल्या 24 तासात कालपेक्षा म्हणजेच गुरूवारपेक्षा कमी नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात 372 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील तिघांचा पुण्यात आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 4 हजार 417 झाली आहे. दिवसभरात 209 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 66 हजार 209 वर जाऊन पोहचली आहे. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 57 हजार 164 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना आता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 4 हजार 628 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 378 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 240 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत.