Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं कर्ज अन् क्रेडिट कार्डच्या EMI वर मिळणार ‘दिलासा’, सरकारनं दिले ‘संकेत’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – मागील मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बँकिंग आणि टॅक्स संबंधित काही अशा घोषणा केल्या ज्याने सर्वसामान्यांना बराच दिलासा मिळेल. यासह त्यांनी आणखी काही चांगले संकेत देखील दिले आहेत.

निर्मला सीतारमन म्हणाल्या, अर्थव्यवस्थेत ज्या क्षेत्रात काहीही समस्या असेल ती दूर केली जाईल. याची सुरुवात आजपासून सुरु झाली आहे आणि यापुढे देखील या संंबंधित घोषणा केल्या जातील. या दरम्यान जेव्हा निर्मला सीतारमन यांनी बँक कर्ज आणि ईएमआयसंबंधित प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्या म्हणाल्या की गरज भासल्यास यासंबंधित घोषणा केल्या जातील. त्यामुळे ही शक्यता आहे की कर्ज आणि क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय देत असलेल्या लोकांना त्यात तातपुरती सूट मिळू शकते.

एटीएममधून पैसे काढणे फ्री –
पुढील तीन महिन्यांसाठी एटीएममधून पैसे काढल्यास त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, ते पूर्णता मोफत असेल. यासह किमान रक्कमेची (मिनिमम बॅलेंसची) किटकिट राहणार नाही. अर्थमंत्र्यांनी डिजीटल उद्योगासह बँक शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल व्यवहाराला प्रोस्ताहन देण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

याशिवाय आयकर रिटर्न भरणे आणि जीएसटी रिटर्न भरणे यावरील मर्यादा 30 जून पर्यंत वाढवली आहे. याशिवाय पॅन आधारला जोडण्याची तारीख देखील वाढवून ती 30 जून करण्यात आली आहे. जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्याची तारीख देखील बदलण्यात आली आहे.