Covid in India : देशात 24 तासांत 47 हजारांपेक्षा जास्त कोरोना केसेस, 275 लोकांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४७ हजार २६२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. २३ हजार ९०७ रुग्ण बरे झाले. २७५ लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे आणि संक्रमणाच्या नवीन प्रकरणात या राज्यांचा हिस्सा ८०.५% आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ३४ हजार ५८ लोक या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत. यापैकी १ कोटी १२ लाख ५ हजार १६० रुग्ण बरे झाले आहेत, तर १ लाख ६० हजार ४४१ लोकांनी प्राण गमावले आहेत. सध्या ३ लाख ६८ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच ते कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

गृह मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत प्रभावी नियंत्रणासाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहे. या सूचना १ एप्रिलपासून लागू होतील आणि ३० एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील. यामध्ये टेस्ट, ट्रॅकिंग आणि ट्रीट प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व राज्यांकडून देण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारने विमानतळ, रेल्वे स्थानक, आंतरराष्ट्रीय बस टर्मिनलवर इतर राज्यांकडून येणाऱ्या प्रवाशांचे रँडम टेस्टिंग अनिवार्य केले आहेत. दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी होळी, शब-ए-बारात आणि नवरात्र साजरी करण्यास बंदी घातली आहे.

४५ वयवर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना मिळणार लस
यादरम्यान मंगळवारी मोदी सरकारने देशात लसीकरणाविषयी मोठी घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून ४५ वयवर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ ४५ ते ६० वर्षादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या लोकांना लस दिली जात होती.

कोरोना बाधित प्रमुख राज्यांची स्थिती
महाराष्ट्र: येथे मंगळवारी २८,६९९ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यातील १३,१६५ बरे झाले, १३२ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात २५.३३ लाख लोक या महामारीला बळी पडले आहेत. त्यामध्ये २२.४७ लाख बरे झाले, तर ५३,५८९ लोकांचा मृत्यू झाला. सोमवारच्या तुलनेत रुग्ण संख्येत वाढ नोंदवली गेली. सोमवारी २४,६४५ केसेस होत्या.

पंजाब: गेल्या २४ तासांत २,२५४ नवीन रुग्ण मिळाले आहेत. १,४२६ बरे झालेत, तर ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यामध्ये आतपर्यंत २.१७ लाख लोक या महामारीला बळी पडले आहेत. त्यामध्ये १.९ लाख बरे झालेत तर ६,४३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोना प्रकार वेगात पसरत असल्याची बातमी आहे. जीनोम सीककेंसिंगसाठी पाठविलेल्या ४०१ नमुन्यांपैकी ८१% मध्ये ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना प्रकार सापडल्याची पुष्टी आहे.

गुजरात: आदल्या दिवशी राज्यात कोरोनाचे १,७३० नवीन कोरोना रुग्ण सापडले. त्यातील १,२५५ रुग्ण बरे झाले. तर ४ लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत २.९ लाख लोक या महामारीला बळी पडले आहेत. यामध्ये २.७७ लाख लोक बरे झालेत. तर ४,४५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे २८ फेब्रुवारीला ४०७ केसेस होत्या त्यानंतर दररोज यात वाढ नोंदवली गेली.

दिल्ली: येथे मंगळवारी १,१०१ नवीन केसेस आल्या आहेत. ६२० रुग्ण बरे झाले आहेत आणि ४ संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत ६.४९ लाख लोक या महामारीला बळी पडले आहेत. ६.३४ लाख बरे झाले आहेत आणि १०,९६७ लोकांनी आपला प्राण गमावला आहे. आता ४,४११ लोकांवर उपचार चालू आहे. येथे १ मार्चला १७५ केसेस होत्या म्हणजे २३ दिवसात येथे १,००० पेक्षा जास्त केसेसची वाढ झाली आहे.

जगातील कोरोना रुग्णसंख्या १२.४२ लाख
जगभरात कोरोना केसेस वाढत आहेत. गेल्या २४ तासांत ४.०५ लाख लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. ७ हजाराहून अधिक लोकांनी प्राण गमावले. आतापर्यंत जगात १२.३८ कोटी लोक कोरोनाला बळी पडले आहेत. १०.०२ कोटी लोक बरे झाले आहेत आणि २७.३५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या २.१२ करोड रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही संख्या www.worldometers.info/coronavirus अनुसार आहे.