Coronavirus Vaccine : भारतातील ऑक्सफोर्ड वॅक्सीनचं ट्रायल एका आठवडयासाठी टळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जगभरात कोरोना वॅक्सीनवर ट्रायल सुरु आहे. सर्वात जास्त अपेक्षा ऑक्सफोर्डच्या वॅक्सीन कडून केली जात आहे. जगातील अनेक देशांमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे ट्रायल सुरु आहेत. भारतात या वॅक्सीनचं ट्रायल घेण्यात येणार आहे पण चंदीगडच्या द पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये होणारं ट्रायल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. हे ट्रायल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केलं जाणार होतं.

ट्रायल पुढे ढकलण्याचे कारण सुरक्षेसंबंधी असल्याचं सांगितलं जात आहे. डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने न्यूज एजन्सी IANS ला माहिती देताना सांगितलं की सेफ्टी अप्रूव्हल न मिळाल्याने हा ट्रायल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या ट्रायलसाठी 100 लोकांना निवडण्यात आलं आहे.

ट्रायलमध्ये उशीर झाल्यामुळे स्वयंसेवकांची भरती थांबवण्यात आली आहे. सध्या या ट्रायलसाठी 400 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं असून त्यापैकी 253 लोकांना वॅक्सीनचा पहिला डोस दिला जाईल. PGIMER मध्ये होणाऱ्या वॅक्सीन शेड्यूलचे प्रिन्सिपल इन्वेस्टीगेटर प्रोफेसर मधू गुप्ता म्हणाले, ‘सध्या ऑक्सफोर्ड वॅक्सीन ट्रायलसाठी होणारी लोकांनी भरती थांबवण्यात आली आहे कारण आम्ही डाटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाकडून आधी 100 स्वयंसेवकांच्या सुरक्षेच्या मंजुरीची वाट पाहत आहोत.’

प्रोफेसर गुप्ता म्हणाले, ‘यासंबंशी कोणतेही अपडेट पुढील आठवड्यापर्यंत दिले जाणार नाहीत.’ त्यांनी यायाधी सांगितलं होतं की त्यांच्यासोबत हे ट्रायल करण्यासाठी एकूण 16 जण आहेत. PGIMER त्या 17 ठिकाणांपैकी एक आहे ज्यांना ह्युमन क्लिनिकल ट्रायलसाठी निवडण्यात आलं होतं. ही वॅक्सीन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी एस्ट्राजेनेका सोबत मिळून बनवली जात आहे. ट्रायल पूर्ण झाल्यानंतर वॅक्सीनच्या निर्मितीचं आणि मार्केटिंगचं काम पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाद्वारे केलं जाणार आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठ्या वॅक्सीन उत्पादक कंपन्यापैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिट्युटने सांगितलं होतं की या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना वरील वॅक्सीन तयार होईल. आता रशियाने देखील सांगितलं आहे की या आठवड्यात लोकांसाठी वॅक्सीन उपलब्ध करून देण्यात येईल.