दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1256 रूग्णांची ‘कोरोना’वर मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पुणे शहरात गेल्या 24 तासात तब्बल 1256 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात कोरोनाचे 854 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर कोरोनामुळं पुणे शहरातील 37 जणांचा आज मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 18 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळं पुणे शहरात आजपर्यंत मृत्यू होणार्‍यांची संख्या ही 3121 वर जाऊन पोहचली आहे.

सध्या पुणे शहरात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 12 हजार 665 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 12 हजार 172 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 17 हजार 372 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 952 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 492 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमाचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.