‘कोरोना’च्या भीतीनं ड्रामा क्वीन राखी सावंत यावर्षी होळी खेळणार नाही, लोकांना केलं ‘हे’ अपील (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कॉन्स्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडत असते. गेल्या काही दिवसांपासून राखी कोरोना व्हायरसवर अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. पुन्हा एकदा राखीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी लोकांना होळी खेळू नका असं अपील ती करताना दिसत आहे. सध्या राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

राखीनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. राखी म्हणते, “यावेळी होळी खेळू नका. कारण होळीत जे कलर वापरले जातात, जे बलून्स वापरले जातात ते चीनमध्ये बनवले जातात. जेव्हा लोक या वस्तू बनवत होते तेव्हा कोरोना व्हायरस होता.”

https://www.instagram.com/p/B3rl4s5JRQo/

राखी पुढे म्हणते, “जर एक वर्षी कोणीच होळी खेळली नाही तर मला वाटतं की, काहीच होणार नाही.” होळी खेळली नाही तर कोरोनापासून बचाव होईल असं राखीचं म्हणणं आहे.

https://www.instagram.com/p/B2A1UFWpQ_g/

राखी म्हणते, “फक्त एका वर्षाचाच तर प्रश्न आहे. मला फक्त तुमची चांगली हेल्थ पहायची आहे. या वर्षी मी तर होळी खेळणार नाही. तुम्हीही खेळू नका.” राखीनं या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये राखी म्हणते, “तुमचा 2-3 तासांचा उत्सव एखाद्याचा जीव घेऊ शकतो. आपण आजूबाजूचं वातावरण साफ आणि स्वच्छ ठेवायला हवं.

https://www.instagram.com/p/B1c_D3xptU1/

राखीनं हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं अपील केलं आहे. जेणेकरून लोक याबाबत समजतील आणि होळी खेळणं टाळतील.

https://www.instagram.com/p/BzDEoH-Ba80/

https://www.instagram.com/p/BtVT-ILBPPN/

https://www.instagram.com/p/BsbB5Q3gR7k/