‘कोरोना’ पुर्णपणे शरीरातून जाण्यासाठी लागतो ‘एवढया’ दिवसांचा कालावधी – रिपोर्ट

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा बाधा होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढत असून आता इटलीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरस शरीरातून कायमचा जाण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो असे म्हटले आहे. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी त्यांची दुसरी चाचणी केली पाहिजे, असेही नमूद केले आहे.

मोडेना आणि रेजिओ एमिलिया युनिव्हर्सिटीचे डॉ. फ्रान्सिस्को व्हेंतुरेली आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 1हजार 162 रुग्णांचा अभ्यास केला. यात कोरोना रूग्णांची दुसरी चाचणी 15 दिवसांनी, तिसरी 14 दिवसांनी आणि चौथ्यांदा 9 दिवसांनी करण्यात आली. त्यामध्ये असे आढळले की ज्यांचे पूर्वीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, आता ते पॉझिटिव्ह आहेत. पाच लोकांच्या निगेटिव्ह चाचणीत सरासरी एक निकाल चुकीचा असतो. अभ्यासानुसार 50 वर्षापर्यंतच्या लोकांना 35 दिवस आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना बरे होण्यासाठी 38 दिवस लागत असल्याचे निष्पन्न झाले आहे .