COVID-19 : ‘कोरोना’च्या दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा होऊ शकतो मृत्यू – WHO

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यास लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना डब्ल्यूएचओचे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले की, तेव्हा महामारी सप्टेंबर – ऑक्टोबरच्या थंड वातावरणात तीव्रता वाढली होती.

इटलीच्या एका वृत्तसंस्थेशी बोलताना राणीर गुएरा म्हणाले की, सुमारे 100 वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या दुसर्‍या लाटेमध्ये कोट्यवधी लोक मरण पावले होते. ते म्हणाले की, स्पॅनिश फ्लूही कोविडप्रमाणे काम करत होता. तरीही उन्हाळ्यात प्रकरणे कमी झाली होती, परंतु नंतर त्यात वाढ झाली.

तत्पूर्वी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितले की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून जर आपण काही शिकलो तर कोरोनाची दुसरी लाट नक्कीच येऊ शकते.

यापूर्वी काही अभ्यासांमधून असे दिसून आले होते की, कोरोना विषाणूचा प्रसार जास्त उष्णतेमध्ये कमी होतो, परंतु इतका कमी होत नाही की संसर्ग थांबतो. त्याचबरोबर साथीच्या रोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साथीच्या दुसर्‍या लाटेची कोणतीही निश्चित व्याख्या नाही आणि आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 97.7 लाख रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर जगभरात कोरोना विषाणूमुळे 4.9 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.