‘हे’ आहेत 5 संकेत ! फुफ्फुसंच नव्हे तर शरीराच्या इतर अवयवांवर सुद्धा कोरोनाचा परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्या व्यक्तीला डायबिटीज, हायपरटेंशन किंवा लठ्ठपणाची समस्या असेल तर कोरोनाचा शरीरावर जास्त परिणाम होतो. अशावेळी आवश्यक आहे की, तुम्ही कोरोना संक्रमित झाल्यानंतर आपल्या सर्व लक्षणांकडे लक्ष द्या. शरीरात होत असलेल्या कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना आपल्या पूर्ण शरीराला कशाप्रकारे प्रभावित करतो ते जाणून घेवूयात.

1. हृदयावर परिणाम –
ज्या लोकांना अगोदरपासून हृदयासंबंधी आजार आहे किंवा ज्यांची मेटाबोलिक सिस्टम खराब असेल, त्या लोकांमध्ये कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. सार्स-कोव्ह-2 व्हायरस कोरोना रूग्णांच्या हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज वाढवतो.

2. न्यूरोलॉजिकल समस्या –
मागील काही रिपोर्टनुसार, कोविड-19 च्या रूग्णांमध्ये मानसिक द्विधा, भ्रम, डोकेदुखी, चक्कर येणे आणि अस्पष्ट दिसण्यासारख्या समस्या समोर आल्या होत्या. पुढे जाऊन अल्झायमर आणि पार्किंसन्स सारखे आजारसुद्धा होऊ शकतात.

3. किडनी होऊ शकते खराब –
इतर समस्यांसह कोरोनाच्या रूग्णांमध्ये किडनीची समस्या सुद्धा वाढत चालली आहे. किडनीत पोहचल्यानंतर हा व्हायरस गंभीर सूज निर्माण करतो. यामुळे किडनी व्यवस्थित काम करू शकत नाही.

4. ब्लड क्लॉट –
कोविड-19 शरीरात गंभीर सूज निर्माण करतो, ज्यामुळे अनेक लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. यावर अजूनही स्टडी सुरू आहे.

5. रिकव्हरी टाइमवर परिणाम –
कोविड-19 शरीरच्या अनेक भागात सूज निर्माण करतो. ज्यामुळे कुणा-कुणाला यातून बरे होण्यास खुप वेळ लागतो.