Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक करणार्‍या ‘त्या’ 25 जणांना अटक

ओडिशा : वृत्तसंस्था – संचार बंदी काळात पोलिसांवर व सरकारी कर्मचारी वर्गावर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहे. इंदोर मध्ये वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवरती आणि पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल करून काहींना अटकही करण्यात आली आहे. आता, ओडिशा मधील कटक या भागात पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या २५ मुस्लिम नागरिकांना पोलिसांना अटक केली आहे.

ओडिशातील कटक येथील २५ मुस्लिमांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. याच काळात ओडिशात ४८ तासांची म्हणजे २ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, या काळात तेथील मुस्लिम नागरिकांनकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

या संदर्भात माहिती देताना कटकचे पोलीस आयुक्त अखिलेश्वर सिंग यांनी म्हटले की, मंगलाबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि काही पोलिस कर्मचारी केशरपूर या भागात गस्त घालता होते. त्यावेळी त्यांना काही नागरिक मशिदीजवळ बसलेले दिसले. तेव्हा पोलिसांनी संगितले की संचारबंदी सुरु असून, तुम्ही बाहेर का बसला आहात असा प्रश्न पोलिसांनी विचारला असता. तेथील बसलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला. यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर ताबडतोब या परिसर मध्ये दोन अधिकची पथके तैनात केली. तर या घटनेचे पडसात उमटू नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन कार्यवाही केल्याचं सिंग यांनी म्हंटले.

दरम्यान, या मुस्लिम नागरिकांवर पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आयपीसीच्या कलमान्यवये दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले असून २६०० नागरिकांना रविवारी ताब्यात घेतले आहे. तसेच ४०० पेक्षा जास्त दुचाकी वाहनेही जप्त केली आहे. असे सिंग यांनी सांगितले.