Coronavirus : काय सांगता ! होय, ‘या’ टेस्टमुळं समजेल देशातील ‘कोरोना’च्या रूग्णांचा खरा आकडा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातील हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी आता कदाचित निदान करण्यासाठी सिरोलॉजिकल टेस्ट म्हणजे रक्तचाचणी केली जाऊ शकते. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने सिरोलॉजिकल टेस्टसाठी 15 लाख अँटिबॉडी किट्ससाठी कोटेशन मागवले आहे. या किट्सचा उपयोग रिसर्च, मॉनिटरींग आणि तपासणीसाठी होऊ शकतो. रक्तातील अँटिबॉडीजमुळे किती लोक व्हायरसच्या संपर्कात आलेत ते समजू शकणार आहे.

एखाद्या व्हायरसने किंवा पॅथोजनने हल्ला केल्यानंतर शरीर त्याच्याशी किती लढते याची चाचपणी केली जाणार आहे. फॉरेन पार्टिकल म्हणजे शरीराच्या बाहेरील घटक असतात, ज्यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज पॅथोजनवर हल्ला करतात. आणि त्यांना कमजोर बनवतात त्यामुळे आपण निरोगी राहतो आणि म्हणूनच एकदा झालेला आजार पुन्हा झाल्यास आपल्यावर त्याचा परिणाम कमी होतो. सिरोलॉजिकल टेस्टमधून याच अँटिबॉडीजबाबत माहिती मिळते. ही रक्तचाचणी आहे. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मते एखादी व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आली की नाही हे तपासण्यासाठी ही टेस्ट असते. यामध्ये रक्तातील सिरम घेतले जाते. ज्यामध्ये लाल आणि पांढर्‍या रक्तपेशी नसतात.

रक्तातील सिरमची चाचणी केली जाते आणि त्यामध्ये काही अँटिबॉडीज आहेत का हे पाहिले जाते. या अँटिबॉडीज एखादा पॅथोजन असल्यावर तयार होतात. व्हायरसचा संसर्ग झाल्यास सिरोलॉजिकल टेस्टमार्फत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या विशेष पॅथोजनवर प्रतिक्रिया देते आहे की नाही हे तपासलं जाते.रिअल टाइम झउठ मध्ये रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्यामध्ये व्हायरस असतील की नाही, शिवाय एखाद्याच्या शरीरात व्हायरस असल्यानंतरही त्याच्यात लक्षण दिसत नसतील तर व्हायरसचे निदान होत नाही. मात्र सिरोलॉजिकल टेस्टच्या मदतीने हे समजू शकते.