Coronavirus : हवेलीत आजपर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या, आज तब्बल २९३ कोरोना रुग्ण

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – हवेलीत आज कोरोना रुग्णाणची उच्चांंकी संख्या एकाच दिवशी तब्बल २९३ जण झाले संक्रमित त्यामुळे अनेकांना धडक्या भरल्या असल्या तरीही बेपर्वाई मात्र शिगेला पोहोचली आहे.
हवेलीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांच्याकडून प्राप्त माहिती नुसार कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजची रुग्णसंख्या ही सर्वोच्च असल्याचं कळले. आजच्या तपशीलानुसार हवेलीतील एकूण १२ प्राथमिक आरोग्य केंद्रात आज एकूण २९३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १९२९ वर पोहोचली यामध्ये वाघोलीत सर्वाधिक २६८, नर्हे १४५, नांदेड १०० तर पूर्व हवेलीतील लोणी काळभोर १०२, कदमवाकवस्ती ९७, उरुळी कांचन ९७, केसनंद ५०, आव्हाळवाडी ४५, कुंजीरवाडी ३४, सोरतापवाडी ३४, थेऊर २३ तसेच कोरेगाव मूळ ३५ अशी परिस्थिती आहे.

राज्य सरकारने संचारबंदी लागू केल्यानंतर नागरिकांकडून अपेक्षित असलेली साथ मिळत नाही तर अरोग्य विभागास इतर खात्याकडूनही कसले सहकार्य मिळताना दिसत नाही. गेल्या लाॅकडावूनच्या दरम्यान पोलीस खात्याने मोठी जबाबदारी पार पडली परंतु यावेळी मात्र त्याची भूमिका नगण्य असल्याचे दिसून येत आहे तर महसूल विभाग तर कुठेही दिसून आला नाही थेऊर मंडलाधिकारी, तलाठी कुठे आहेत याची माहिती नाही, संपर्क होत नाही मग हे शिवधनुष्य केवळ आरोग्य खाते एकटेच पेलवणार का हा नागरिकासमोरचा प्रश्न आहे.