Coronavirus : तिसर्‍या लाटेपुर्वी दिलासा ! सुरक्षित ट्रान्स्परंट मास्क लवकरच बाजारात येणार, ट्रायल ‘यशस्वी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच तिस-या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पालकांनी सावधगिरी बाळगल्यास तिसरी लाट परतवून लावला जाईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संघटना (सीएसआयओ) ने पारदर्शक मास्क (transparent mask) बनवला आहे. याद्वारे लहान मुले सुरक्षित राहू शकतील असा दावा केला आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच हा मास्क देशभरातील मुलांना मिळावा यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. या मास्कची किंमत 200 ते 300 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

हा ट्रान्स्परंट मास्क transparent mask जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी सीएसआयओने उत्तर प्रदेशच्या एका मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे. एएसआयओच्या संशोधक डॉ. सुनिता मेहता यांनी मार्चमध्ये अशाप्रकारचा मास्क बनविला होता. हा मास्क पॉलिमरचा होता. त्याचा आकार छोटा असल्याने तो तोंडावर ठीक बसत नव्हता. तसेच श्वास घेताना मास्कचे प्लॉस्टिक नाका तोंडाला चिकटत होते. सोडताना बाहेर जात होते. त्यामुळे तिसरी लाट अन् लहान मुले यांच्यासाठी धोक्याचा दिल्याने वैज्ञानिकांनी या मास्कला अपग्रेड करण्यास सुरुवात केली आहे. हा मास्कदेखील पॉलीमरचा आहे. या मास्कची आउट लाईन ही अल्ट्रासोनिक वेल्टिंग केली आहे. यामुळे तो आधीच्या सारखा आत-बाहेर करत नाही. यात अन्य काही गोष्टी देखील लावल्या आहेत. मास्क तयार होताच याचा प्रयोग लायन्स क्लब डीफ अँड डंब स्कूलच्या विद्यार्थ्यांवर केला आहे. मास्क लावल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास काही अडचणी होतात का याची पाहणी केली आहे. हा प्रयोग सफल झाला आहे.

मास्कची वैशिष्टये
1)
मास्कमुळे चेहरा दिसणार आहे. विमानतळ, रेल्वेस्थानकावर लोकांना सीसीटीव्हीमध्ये पाहता येणार आहे.
2) धाप लागत नाही आणि फॉगिंगही होत नाही. व्हायरसही आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही.
3) एक मास्क 20 ते 25 वेळा आरामात वापरता येणार आहे.
4) साबनाने धुता येईल. तसेच सॅनिटायझरने साफही करता येणार आहे. पाण्याचे थेंब आत प्रवेश करू शकणार नाहीत.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’