Coronavirus : धोका असूनही ‘निरोगी’ लोकांना केलं जाणार ‘कोरोना’ संक्रमित ? WHO नं दर्शविली ‘सहमती’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्या विवादित चाचणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे ज्यामध्ये निरोगी लोकांना कोरोना विषाणूची लागण होईल. यावेळी स्वयंसेवक असणारे लोक देखील गंभीर आजारी पडू शकण्याची धोका आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार डब्ल्यूएचओने म्हटले आहे की निरोगी स्वयंसेवकांना कोरोना संक्रमित केल्याने लस तयार करण्याच्या प्रक्रियेस गती येईल. आरोग्य संघटनेने या कारणास्तव याला नैतिकदृष्ट्या योग्य म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही लसीच्या चाचण्यांबाबत आठ अटी निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत केवळ 18 ते 30 वर्षे वयोगटातील लोकांना समाविष्ट केले जाऊ शकते. निरोगी लोकांना संसर्गित केल्यानंतर त्यांच्यावर लसीचा परिणाम पाहणे याकडे एक आव्हानात्मक चाचणी म्हणून पहिले जात आहे. असे प्रयोग मलेरिया, टायफाइड, फ्लूची लस तयार करण्यासाठी करण्यात आले आहेत. तथापि, या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे उपलब्ध होती. परंतु कोरोना विषाणूने संक्रमित झाल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नाहीत. यामुळे निरोगी व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर त्याला बरे करणे कठीण होणार आहे.

ज्यांना आधीच संसर्ग झाला आहे त्यांच्यावर ही लस चाचणी केली जाते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि इम्पीरियल कॉलेज लंडनकडून अशा लोकांवरच ट्रायल सुरु करण्यात आली आहे. तथापि, ही प्रक्रिया धीमी असते आणि याचा वेग वाढविण्यासाठी चॅलेंज ट्रायल ची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान भारतासह जगात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. रविवारी सकाळी भारतात जवळपास 63 हजार कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. तर 2109 लोकांनी आपला जीव गमावला आहे.