कोरोनाचा हाहाकार उडाला असताना व्हायरसचा ट्रिपल म्युटंट आला समोर, जाणून घ्या किती धोकादायक

नवी दिल्ली : भारतात कोरोना प्रसार वेगाने सुरू आहे. स्थिती रोजच्या रोज बिघडत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये सुविधा अपुर्‍या पडत आहेत. मागील 24 तासात तर अडीच लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. या दरम्यान जीवघेण्या व्हायरसबाबत एक असे वृत आले आहे जे आणखीच भितीदायक आहे. होय, कोरोना व्हायरसचा ट्रिपल म्युटंट व्हेरिएंट सापडल्याची बातमी आहे. रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे की, देशाच्या काही भागात ट्रिपल म्युटंट व्हेरिएंट आढळला आहे. या व्हेरिएंटने कोरोना व्हायरसला अचानक वाढवले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, याच व्हेरिएंटमुळे व्हायरसची दुसरी लाट धोकादायक झाली आहे. आता ती पीकवर आहे.

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) ने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये नवीन व्हेरिएंटची माहिती दिली होती. या व्हेरिएंटला बी.1.617 नाव दिले होते. यामध्ये दोन प्रकारचे म्युटेशन्स आहेत ई484क्यू आणि एल452आरआय हे व्हायरसचे ते रूप आहे ज्यात जीनोममध्ये दोन वेळा परिवर्तन झाले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार हा व्हेरिएंट खुपच धोकादायक आहे आणि शरीराच्या रेस्पिरेटरी सिस्टमचे नुकसान करतो. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये हा ट्रिपल म्युटंट व्हायरस सापडला आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर वेळीच या व्हेरिएंटला रोखता आले नाही तर आगामी दिवसात याचे घातक परिणाम दिसून येतील. तर शास्त्रज्ञ या स्ट्रेनवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. नवीन व्हेरिएंट समोर आल्यानंतर सरकारसुद्धा चिंतेत आहे. केंद्र सरकारने राज्यांना आवाहन केले आहे की, कोरोना संक्रमित सॅम्पलला रँडमली जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले पाहिजे. असे न झाल्याने म्युटेशनशी संबंधीत संसर्गाबाबत योग्य माहिती मिळणार नाही.