Coronavirus : ‘कोरोना’बाधितांच्या संख्येवर शंका, ICMR आणि NCDC यांच्यातील आकडयांत मोठा ‘फरक’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   देशातील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (NCDC) या दोन संस्था कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आणि मृत्यू यांवरती लक्ष ठेवून असतात. तसेच दोन्ही संस्था कोरोना संसर्गाची आकडेवारी आपल्यापर्यंत पोहचवतात. परंतु, या संस्थांनी दिलेली आकडेवारी मात्र जुळत नाहीयं.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, रविवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजीव गौबा आणि राज्यांचे आरोग्य सचिव यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला गेला. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाच्या काही प्रकारणांकडे लक्षचं दिलं गेलं नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.

दोन्ही संस्थाच्या आकडेवारीत फरक

एनसीडीसीने म्हटल्यानुसार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत भारतात एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या २६,४९६ होती. तर आयसीएमआरने म्हटलं की, देशातील एकूण रुग्ण संख्या २७,५८३ आहे. म्हणजे इथं एकूण १०८७ रुग्णांचा फरक दिसून येतो. केंद्रीय सचिवांच्या बैठकीत सादरीकरणाच्या वेळी असं दिसून आलं की, एनसीडीसी व आयसीएमआरची आकडेवारी फक्त ८ जागेवरती समान आहे. ही पूर्वोत्तर, दादर आणि नगर हवेली, दमन आणि दिव आणि लक्षद्वीप अशी ५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहे. या आठ जागांपैकी चार ठिकाणी एकही प्रकरणं नाही. केवळ एका राज्यात २ पेक्षा जास्त प्रकरण आहेत. मेघालयात १२ प्रकरण आहे.

या राज्यांमध्ये आहे फरक

एनसीडीसीच्या तुलनेपेक्षा आयसीएमआरच्या नोंदणीमध्ये २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक फरक हा महाराष्ट्र, गुजरात,आणि पश्चिम बंगालमध्ये नोंदविला गेला. जिथे आयसीएमआर आकडेवारी अनुक्रमे ८,८४८ ३,८०९ आणि ७७० दर्शवितो. तिथे एनसीडीसीची आकडेवारी अनुक्रमे ७,६२८ ३,०७१ आणि ६११ प्रकरणे आहे. महाराष्ट्रात १,२२० रुग्णांचा फरक दाखवतो.

एनसीडीसीने दर्शवली या राज्यात सार्वधिक संख्या.

देशातील अशी आठ राज्य आहे जिथे एनसीडीसीची संख्या आयसीएमआरपेक्षा देखील जास्त आहे. दिल्ली, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यांतील आकड्यांमध्ये मोठा फरक आहे. उदा. दिल्लीची एनसीडीसी संख्या २,६२५ आहे तर आयसीएमआर ही संख्या २,१५५ दाखवते. मध्यप्रदेशची एनसीडीसी संख्या २०९६ आहे तर आयसीएमआर संख्या १७७८ आहे. तसेच उत्तरप्रदेशातील एनसीडीसी संख्या १७९३ आहे तर आयसीएमआर संख्या १५७२ आहे. मग बाकीचे रुग्ण कुठं गेले किंवा कोणता आकडा नेमका खरा यांवरती नागरिकांमध्ये संभ्रम आहे.