COVID-19 : भारतामध्ये 5 लाख टेस्टनंतर ‘कोरोना’चे 20 हजार रूग्ण, US मध्ये एवढया Test नंतर होते 80 हजार ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या विरोधात सर्वच देश लढत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने अमेरिकेला टाकले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे आव्हान असताना प्राण कसे वाचवायचे हे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्ही चाचण्या वाढविण्यावर जोर देत आहोत. आयसीएमआरच्या मते, भारतात 5 लाख चाचण्या करण्यात आल्या असून 21 हजार टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर अमेरिकेत 5 लाख टेस्टमध्ये 80 हजार लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.

5 लाखाहून अधिक चाचण्या – ICMR

आयसीएमआरचे संचालक डॉ. सीके मिश्रा म्हणाले की, 23 मार्चपर्यंत आम्ही 14 915 चाचण्या घेतल्या असून 22 एप्रिलपर्यंत आम्ही 5 लाखापेक्षा अधिक चाचण्या केल्या आहेत. जर याची गणना केली गेली तर ती 30 दिवसामध्ये जवळपास 30 पट अधिक आहे. परंतु हे पुरेसे नाही. देशात रॅम्प टेस्टिंग करणे आवश्यक आहे. आयसीएमआरने म्हटले की, आम्ही कोरोनाचा प्रसार कमी करण्यास सक्षम आहोत, कोरोनाचा प्रसार रोखून प्रकरणे दुप्पट होणारा दर रोखू शकतो.

लॉकडाउनला एक महिना पूर्ण

आयसीएमआरने सांगितले की, आज लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. आम्ही कोरोनाविरुद्ध टेस्टिंगचा शस्र म्हणून वापर करत आहोत. सतत चाचणी क्षमता वाढविण्यावर भर दिला जात असून आम्ही आखलेल्या रणनितीचा परिणाम होताना दिसून येत आहे.

देशातील 3777 कोरोना रुग्णालये

लोकांना रुग्णालयात येण्यापासून रोखणे हे आमचे ध्येय असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे. कोरोनाच्या रुग्णालयांमध्ये सतत वाढ होत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी एकूण 3777 रुग्णालये सज्ज आहेत. यात विलिगकरण बेड्सची संख्या 194026 आहे तर आयसीयू बेडची संख्या 24644 आहे.
गृह मंत्रालयाचे सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यासाठी कृषी कामांना परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवांना निर्बंधनातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय प्रीपेड मोबाइल रिचार्ज दुकानांना सूट देण्यात आली आहे. शहरांमध्ये दूध व ब्रेड कारखान्यांना सूट देण्यात आली आहे. डाळी व पीठ गिरण्यांमध्ये कामाची सूट देण्यात आली आहे. पुस्तके आणि विजेच्या दुकानांनाही सूट देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.