Coronavirus : फक्त लस बनवून नष्ट नाही होणार ‘कोरोना’ महामारी, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगभरातील लोक कोरोना महामारी रोखण्यासाठी लस तयार होण्याची वाट पाहत आहेत. बऱ्याच देशात कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या लसींवर काम चालू आहे आणि बर्‍याच देशांमध्ये चाचण्या व उत्पादन सुरू केले गेले आहे. पण लस बनवण्याच्या यशामुळे महामारी संपेल काय? चला जाणून घेऊया-

लस तयार झाल्यानंतर काय परिस्थिती होईल, हे समजून घेण्यासाठी व्हेंटिलेटरच्या आकडेवारीवर लक्ष दिले पाहिजे. एका अहवालानुसार, आफ्रिकन खंडातील ४१ देशांमध्ये केवळ २ हजार व्हेंटिलेटर आहेत. तर आफ्रिकेत असे १० देश आहेत जिथे रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर नाही. पण दुसरीकडे अमेरिकेत १ लाख ७० हजार व्हेंटिलेटर आहेत. गरीब देश व्हेंटिलेटरसारखेच लसीपासून देखील वंचित राहू नयेत याची तज्ञांना आता चिंता होत आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, कोरोना विषाणूचे हेच रूप कायम राहिल्यास अनेक वर्ष पुरेशा प्रमाणात लस तयार होणार नाही. तेव्हाही जेव्हा अभूतपूर्व रूपात लस तयार केली जाईल.

अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी लाखो डोसच्या लसीचे उत्पादन सुरू करण्याची तयारी करत आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशांना ही लस प्रथम मिळेल याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय शास्त्रज्ञांनुसार, जगातील ५.६ अब्ज लोकांना रोग प्रतिकारशक्ती मिळवण्यासाठी आणि विषाणूची गती कमी करण्यासाठी लसीचा डोस देण्याची आवश्यकता असू शकते.

बहुतेक देश लसबाबत राष्ट्रवादी भूमिका घेऊ शकतात ज्यामध्ये ते प्रथम त्यांची लोकसंख्या सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतील, भलेही लसीची गरज आणखी कुठे तरी असेल. विशेषत: गरीब देशांना लसीचा खर्च उचलणे कठीण होऊ शकते.

अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये स्वतंत्र लसीकरणाचे काम चालू आहे. हाही एक प्रश्न आहे की, जर अमेरिकेत तयार केलेली लस युरोप किंवा चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या लसीपेक्षा कमी प्रभावी असेल तर अमेरिकेतही लसीची कमतरता भासू शकते.

आरोग्य तज्ञांनी आणखी एका परिस्थितीकडेही लक्ष दिले आहे की, जर लस तयार करणार्‍या कंपन्या सर्वात जास्त किंमत देणाऱ्या खरेदीदाराला लस विकायला लागल्या तर श्रीमंत देशांना सर्वाधिक लस मिळेल. परंतु ज्या देशांमध्ये कंपन्या लस तयार करीत आहेत, तेथील लोकांना लस कमी पडणार आहे.

विकसनशील देशांना लस तयार करण्यास मदत करणारी संस्था ‘गवी’चे सीईओ सेथ बर्कली यांचे म्हणणे आहे की, जर देशांनी केवळ स्वतःबद्दल विचार केला तर हे मॉडेल प्रभावी होणार नाही. कारण जोपर्यंत देश त्यांच्या सर्व सीमा आणि व्यापार बंद करत नाहीत, तोपर्यंत संक्रमण पसरण्याचा धोका असेल. ते म्हणाले की, ही एक जागतिक समस्या आहे आणि याचा जागतिक तोडगा शोधला पाहिजे.

काही बाबतीत लोकांना लसीच्या दोन डोसची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत लसीचा अभाव आणखी वाढू शकतो. त्याचबरोबर लसीच्या चाचणीबरोबरच ज्या कंपन्यांनी लसीचे उत्पादन सुरू केले आहे, त्यांची लस प्रभावी ठरली नाही, तर त्यांचे उत्पादन निरुपयोगी ठरू शकते.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठानेही कोरोना लसीवर चाचणी सुरू केली आहे. लसशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अ‍ॅड्रियन हिल यांचे म्हणणे आहे की, सप्टेंबरपर्यंत ऑक्सफर्डमध्ये तयार केलेली लस जगात दाखल होईल. ही लस भारतालाही मिळू शकते.