अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीनच्या लसमध्ये काय ‘हा’ फरक !, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन,लंडन, दि. 10 सप्टेंबर : सध्या कोरोनावर मात करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीन यांसह भारतानेही लस बनवायला सुरूवात केली आहे. आता यातील वेगवेगळ्या लस ह्या वैद्यकीय टप्प्यावर आहेत. सध्या सुमारे दीडशे लसवर संशोध सुरू आहे. मात्र, यातील मोजक्या लस ह्या वैद्यकीय चाचणीतील अंतिम टप्प्यात आहेत. यात अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि चीन या देशाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे यांच्या लसमधील फरक काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

अमेरिका- मॉडर्ना
मॅसाच्युसेट्सची बायोटेक कंपनी Moderna Inc ही नॅशनल इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थसोबत संयुक्तरीत्या mRNA-१२७३ ही लस विकसित केली जात आहे. या लसच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत अँटीबॉडी विकसित होत आहेत. ही लस यशस्वी ठरल्यास mRNA वर आधारीत ही पहिली लस ठरणार आहे.

सध्याची काय स्थिती?
वर्ष २०२१ पासून दरवर्षी सुमारे ५० कोटी डोस वितरीत केली जातील. यासाठी स्विर्त्झलंडमधील कंपनीसोबत करार केला आहे.

अमेरिका Pfizer
जगातील सर्वात मोठी फार्मा कंपन्यांपैकी एक असलेल्या Pfizer या कंपनीने जर्मनीच्या BioNTech सोबत BNT162b2 या लसवर काम सुरू केलंय.

सध्याची काय स्थिती?
या लसची चाचणी यशस्वी झाल्यास डिसेंबर २०२० मध्ये किमान १० कोटी डोस वितरीत केले जाणार आहेत. यासाठी अमेरिकन सरकारसोबत दोन अब्ज डॉलरचा करार केला आहे. आता अमेरिकेशिवाय, ब्राझील, अर्जेंटिना आणि जर्मनीतील ३० हजारजणांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणे बाकी आहे. कंपनी पुढील वर्षात १.३ अब्ज डोस वितरीत करणार आहे.

ब्रिटन देश : ऑक्सफर्ड विद्यापीठ
ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका या कंपनीसोबत संयुक्तरीत्या ChAdOx1 nCoV-19 (AZD1222) ही लस विकसित करताहेत. ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसचे उत्पादन एस्ट्राजेनका करणार आहे.

सध्या स्थिती काय :
ब्रिटनमधील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला लस दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला होता.. त्यानंतर ही चाचणी स्थगित केली आहे. ब्राझील, ब्रिटन, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील ५० हजार स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येणार होती.

रशिया देश – स्पुटनिक व्ही लस
रशिया देशाच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत लस विकसित केलीय.

सध्याची काय स्थिती?
रशियाने या लसला मंजुरी दिलीय. सध्या या लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरूय. मात्र, जागतिक आरोग्य संघटना या लसला पहिल्या टप्प्यातील चाचणी समजत आहे. रशियाने ही लस आपल्या सामान्य नागरिकांना उपलब्ध केलीय.

चीनच्या तीन लस स्पर्धेत आघाडीवर आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
१) सीनोवॅक (Sinovac) या फार्मा कंपनीने ब्राझीलच्या Butantan सोबत CoronaVac ही लस विकसित केलीय.

सध्याची काय स्थिती?
तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ब्राझीलमध्ये ९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात इंडोनेशिया आणि बांगलादेशमध्येही चाचणी केली जाणार आहे.

२) Sinopharm कंपनी आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ बायलॉजिकल प्रॉडक्ट्ससोबत देखील लस विकसित केली जात आहे. या लसमुळे कोणत्याही साइड इफेक्ट्सशिवाय अँटीबॉडी विकसित झाली आहेत. चीनने ही लस आपात्कालीन स्थितीत वापरली आहे, असे ऑगस्ट महिन्यात जाहीर केले.

सध्या काय स्थिती?
या लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ हजार जणांना लस दिली आहे. त्याशिवाय पेरू, बहरीनमध्येही ही चाचणी होणार आहे.

३) CanSino Biologics ही कंपनीदेखील व्हायरल वेक्टरवर आधारीत कोरोना लस विकसित करत आहे.

सध्या स्थिती काय?
CanSinoची लस वापरासाठी मंजुरी मिळालेली पहिली लस असून चीन सरकारने सैन्याच्या जवानांना वापरासाठी मंजुरी दिलीय. CanSino ची चाचणी सुरू आहे. लवकरच या लसबाबत घोषणा होणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.