Covid-19 : जगभरात ‘कोरोना’ व्हायरसचं थैमान ! ‘या’ 12 देशात एकही रूग्ण नाही, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या सात महिन्यापासून आपल्या सर्वांचा एकही दिवस असा गेला नसेल की ज्या दिवशी तुम्ही ‘कोरोना अथवा कोविड 19’ हे शब्द ऐकले नसतील. आताच्या घडीला कोरोना महामारी संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. 2019 च्या शेवटी चीनमधून आलेला हा कोरोना नावाचा व्हायरस आज जागतिक संकट झालेले आहे. कोरोनाने अमेरिका, ब्राझील, भारत, इंग्लंड, स्पेन, इटली, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि अजून बऱ्याच विकसित आणि अविकसित देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. जगभरात जवळपास 215 देश आणि बेटं या कोरोनामुळे संकटात अडकली आहेत. पण अशा परिस्थितीत देखील जगात असे काही देश आहेत जिथं कोरोनाचे रुग्णच नाहीत. धक्का बसला ना? हो असे बारा देश आहेत, जिथं कोरोना काहीही करू शकला नाही.

सध्या जगभरात जवळपास दीड करोड लोकांना कोरोना झाला असून यामध्ये 6 लाख जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. सध्या संपूर्ण जगात 52 लाख कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या रोज 2-3 लाख रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडत आहेत. अशातच काही देशांनी कोरोनावर जबरदस्त मात केली आहे. काही देशांनी तर कडक नियम व कायदे करून त्या देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊच दिला नाही.

यामध्ये किरिबाटी, मार्शल आईसलँड, मायक्रोनेशिया, नाउरु, ऊत्तर कोरिया, पलाऊ, सामोआ, सोलोमन बेटे, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तूवालू, वाणूआतू या बारा देश आणि बेटांवर कोरोना पसरला नाही.

WHO चा इशारा: कॉरोनामुळे संपूर्ण जग ग्रासलं असताना WHO ने सांगितलं आहे की,” जगातील असे अनेक देश आणि सरकारे आहेत जे अजूनही कोरोनावर योग्य ती खबरदारी घेत नाहीयेत.” अनेक देशांनी लॉकडाउनमध्ये केलेल्या शिथिलतेवरही WHO ने टीका केली आहे. या शिथिलतेचे गंभीर परिणामही त्या देशांना भोगावे लागतील असं सांगितलं आहे.