Corporator Chanda Lokhande | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दुसरा धक्का ! शहर नेतृत्वावर नाराज होत नगरसेविका चंदा लोखंडे यांचा राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Chanda Lokhande | पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) आज आणखी एक धक्का बसला आहे. प्रभाग दोनचे मोशी-जाधववाडी चे नगरसेवक वसंत बोराटे (Corporator Vasant Borate) यांनी काही दिवसांपूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा (Resignation) देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवड भाजपला (PCMC BJP) दुसरा धक्का बसला आहे. पिंपळेगुरव (Pimplegurav) येथील भाजपच्या चंदा लोखंडे (Corporator Chanda Lokhande) यांनी आज (सोमवार) नगरसेविकापदाचा राजीनामा आयुक्त राजेश पाटील (Commissioner Rajesh Patil) यांच्याकडे दिला आहे. भोसरी विधानसभा (Bhosari Assembly Constituency) क्षेत्रापाठोपाठ आता भाजपला चिंचवडमधून (Chinchwad Assembly Constituency) दुसरा धक्का बसला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी भाजपला गळती सुरु झाली आहे. पिंपळेगुरव प्रभाग 29 चे महापालिकेत प्रतिनिधित्व करत असलेल्या चंदा लोखंडे यांनी राजीनामा आयुक्तांकडे दिला असून आयुक्तांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. चंदा लोखंडे या 2017 च्या निवडणुकीत पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही (Chairperson of Women and Child Welfare Committee) भूषविले आहे. (Corporator Chanda Lokhande)

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landage) यांचे समर्थक असलेले वसंत बोराटे यांनी चार दिवसांपूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदा लोखंडे यांनी नगरवेकपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे (Former corporator Raju Lokhande) यांनी सात महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
चंदा लोखंडे या देखील लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

 

याबाबत बोलताना चंदा लोखंडे म्हणाल्या, प्रभागातील विकास कामासंदर्भात पक्ष नेतृत्वाने आपल्याला कधीही विश्वासात घेतले नाही.
भाजप शहर नेतृत्वाला कंटाळून आपण आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

 

Web Title :- Corporator Chanda Lokhande | BJPs chanda lokhande resigns as corporator pimpri chinchwad corporation PCMC

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा