Pune Crime | पुण्यात सैराटची पुनरावृत्ती ! प्रेमविवाह केल्याने बहिणीच्या पतीवर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बहिणीने पळून जाऊन प्रेम विवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून भावाने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बहिणीच्या पतीवर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) दिघी (Dighi) परिसरात रविवारी (दि.20) सकाळी आठच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकातील (magazine Chowk) सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी चार जणांवर दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी बहिणीच्या पतीवर कोयत्याने वार करुन बहिणीला सोबत घेऊन गेले.

 

शुभम नवनाथ बरकडे Shubham Navnath Barkade (वय-22 रा. मु.पो. लिंब ता. कोरेगाव Koregaon, जि. सातारा Satara) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित भोसले Rohit Bhosale (वय-24), गणेश भोसले Ganesh Bhosle (वय-23 दोघे रा. मु.पो. अपशिंगे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि त्यांचे इतर दोन साथिदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे (PSI Rahul Bhandare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम बरकडे आणि आरोपी रोहित भोसले याची बहिण ऋतुजा यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत. शुभम आणि ऋतुजा यांनी प्रेमविवाह केला आहे. बहिणीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याच्या राग आरोपी रोहित भोसले याच्या मनात होता. रविवारी सकाळी रोहित, ऋतूजा आणि त्यांचा मित्र मंगेश खंडझोडे (Mangesh Khandjode) हे रिक्षातून स्वारगेट (Swargate) येथे जात होते.

मॅगझीन चौकात आरोपींनी त्यांची चारचाकी गाडी रिक्षाला आडवी घालून रिक्षा थांबवली.
त्यानंतर आरोपींनी मंगेश खंडेझोड याला रिक्षातून बाहेर ओढून मारहाण (Beating) केली.
त्यानंतर आरोपी रोहित भोसले याने त्याची बहीण ऋतुजा सोबत फिर्यादी शुभम याने लग्न केल्याच्या
कारणावरुन सोबत आणलेल्या कोयत्याने डोक्यात वार करुन जखमी केले.
तसेच बहिण ऋतुजा हिला सोबत घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Repeat of Sairat in Pune! The sister’s husband was stabbed in the face by a love marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona Vaccines | कोरोना लसींची मुदत संपणार असल्याने 50 हजाराहून अधिक लस वाया जाण्याची भीती

 

Pune Crime | वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटकांच्या गाडीवर हल्ला; मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांचे कृत्य CCTV कैद

 

Corporator Avinash Ramesh Bagwe | नगरसेवक अविनाश रमेश बागवे यांच्या निधीतून प्रभाग 19 मधील ‘संत संताजी महाराज जगनाडे उद्याना’चे भूमिपूजन