धक्कादायक ! नगरसेवकाला नगरसेविकेच्या पतीची बेदम मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली महापालिकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांना नगरसेविका संगीता हारगे यांचे पती अभिजित हारगे यांनी बेदम मारहाण केली. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेतली.
थोरात, संगीता हारगे, स्वाती पारधी हे मिरजेच्या एकाच प्रभागामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. या निवडणुकीत संगीता हारगे याच प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे अभिजित हारगे प्रभागावर प्रभाव आहे.

या प्रभागातील कामे आम्हाला विचारून करावी असा हारगे दांपत्याचा दबाव असल्याचा आरोप नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे. थोरात यांनी प्रभागातील काही कामे प्रस्तावित केली आहेत त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होता.

मंगळवारी दुपारी थोरात महापालिकेच्या मुख्य कार्यालयात कामासाठी आले होते. त्याचवेळी हारगे दाम्पत्य महापालिकेत आले. त्यांनी थोरात यांना कामावरून जाब विचारला. यातून वाद वाढत गेला. त्यांनंतर अभिजित हारगे यांनी थोरात यांना मारहाण करत शिवीगाळ केली. यामध्ये थोरात जखमी झाले. नंतर महापालिकेत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला.त्यांनंतर दोन्ही गटानी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

आरोग्य विषयक वृत्त

या ‘शॉर्टटर्म’ व्यायाम प्रकारांचे अनुभवा ‘लॉंगटर्म’ फायदे

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर