Corporator Pramod Nana Bhangire | नागरी प्रश्नांवर नगरसेवक नाना भानगिरे यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट, केल्या विविध मागण्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महंमदवाडी (Mohammadwadi) उंडरी (Undri) परिसरातील सोसायट्यांमधील नागरी प्रश्नांवर नगरसेवक नाना भानगिरे (Corporator Pramod Nana Bhangire) यांनी शिष्टमंडळासमवेत सहाय्यक आयुक्तांबरोबर (Assistant Commissioner) बैठक घेतली. तीनपट टॅक्स, अपुऱ्या दाबाने होणारा पाणीपुरवठा (Water Supply), कचरा (Garbage), अनधिकृत फ्लेक्स (Unauthorized Flex), ड्रेनेज (Drainage), मनपा टँकर घोटाळा (Municipal Tanker Scam) याकडे नाना भानगिरे (Corporator Pramod Nana Bhangire) यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

 

पालखी सोहळा नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याची केली मागणी नाना भानगिरे (Corporator Pramod Nana Bhangire) यांनी केली. तसेच महंमदवाडी उंडरी परिसरातील सोसायट्यांमधील नागरी प्रश्नांवर नाना भानगिरे यांनी सोसायट्यांमधील पदाधिकारी व रहिवाशांच्या शिष्टमंडळ समवेत हडपसर क्षेत्रीय कार्यालयात (Hadapsar Regional Office) सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर (Assistant Commissioner Prasad Katkar) यांची भेट घेतली.

 

नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पुणे मनपाने लावलेला भरमसाठ तीनपट टॅक्स, अपुऱ्या दाबाने होणारा पाणीपुरवठा, सफाई कामगार पुरेसे नसल्याने साठलेले कचऱ्याचे ढीग, चौकामध्ये अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण, अनधिकृत भाजी मंडईमुळे निर्माण होणारी कचऱ्याची समस्या, वारंवार फुटणाऱ्या ड्रेनेज लाईनी, रामटेकडी येथील लष्कर पाणी पुरवठा केंद्रावरील टँकर घोटाळा, पाण्याची होणारी गळती याकडे प्रशासनाचे लक्ष वेधत या समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष शिवसेना नेते उल्हास तुपे, न्याती विकटोरिया चेअरमन डॉ अंकित खन्ना,
न्याती इटर्निटी चेअरमन दामोदर दाभाडे, न्याती सेरिनिटीचे नंदू काळे, न्याती इथसचे भारत भूषण भाटिया रहिवाशी उपस्थित होते.

 

उपायुक्त प्रसाद काटकर, अतिक्रमण विभागाचे तारु, बडदे, आरोग्य विभागाचे धनवट, शेलार, ससाणे, इंजिनियर कळमकर यांनी नगरसेवक नाना भानगिरे
आणि शिष्टमंडळाशी चर्चा करत महंमदवाडी – उंडरी परिसरातील सोसायट्यांमधील व परिसरातील नागरी
समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने योग्य ती पावले उचलली जातील असे स्पष्ट केले.

 

Advt.

यावेळी संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar Palkhi) आणि संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi)
सोहळा नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व मनपा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याची
नगरसेवक नाना भानगिरे आणि उल्हास तुपे यांनी निवेदन देत मागणी केली.

Web Title :-  Corporator Pramod Nana Bhangire | Corporator Pramod Nana Bhangire along with a delegation met the pmc Assistant Commissioner on civic issues and made various demands.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा