Pune PMC News | 5 वर्षात महापालिकेत सर्वाधीक सत्तेची पदे भोगलेल्या कसबा भाजपवर नागरी सुविधांसाठी आंदोलन करण्याची वेळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | खासदार, आमदार, अडीच वर्षे महापौरपद आणि तीन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद, अडीच वर्षे सभागृह नेतेपद आणि एक वर्ष शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, पाच वर्षे प्रभाग समितीचे अध्यक्षपद भूषविणार्‍या पदाधिकार्‍यांचा भरणा असलेल्या कसबा पेठ (Kasba Peth, Pune) भाजपला (BJP) सत्तापर्व संपुष्टात आल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांतच नागरी सुविधांसाठी ‘आंदोलन’ करावे लागले. यामुळे अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या ‘कोट्यवधीं’च्या तरतुदीतून नेमक्या कोणत्या नागरी सुविधा निर्माण केल्या असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येउ लागला आहे. (Pune PMC News)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

कसबा पेठ भाजपच्या वतीने आज विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाबाहेर (Vishrambaug Ward Office) प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. प्रामुख्याने मध्यवर्ती भागातील ड्रेनेज आणि चोवीस तास पाईपलाईनच्या कामानंतर रस्ते चुकीच्या पद्धतीने दुरूस्त केल्याने पडलेले खड्डे हा विषय आंदोलनाच्या केंद्रस्थानी होता. विशेष असे की, पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने सत्तेच्या चवथ्या वर्षामध्ये मध्यवर्ती भागातील ही कामे हातात घेतली. ते देखिल ५० वर्षांत ड्रेनेज लाईनचे कामच झाले नाही, असे सांगत काही काळ अडचण सहन करा असे आवाहन मध्यवर्ती शहरातून महापालिकेत प्रतिनिधीत्व करणारे सलग चवथ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेले हेमंत रासने (Hemant Rasne) व सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) हे करत होते. (Pune PMC News)

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता या शहराच्या मध्यवर्ती भागातील जीवनवाहीन्या म्हणून परिचित असलेल्या प्रमुख रस्त्यांची खोदाई करून ही कामे करत असताना वाहतुकीचे नियोजन केले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनीही केल्या होत्या तसेच माध्यमांनीही त्यावर सातत्याने झोत टाकला होता. परंतू स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्यांनी त्याकडे तितकेसे गांभीर्याने पाहीले नाही. मध्यवर्ती शहरातील अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण करण्यात आले आहेत. परंतू हे करत असताना चोवीस तास पाणी पुरवठा पाईपलाईन तसेच मिटर बसविण्याचे काम झालेले नसल्याने अनेकठिकाणी नव्याने केलेले कॉंक्रीटचे रस्ते फोडले आहेत. ते देखिल पुर्ववत न बुजल्यानेही खड्डे दिसून आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणे रस्त्यांपेक्षा उंच झाली असून फुटलिही आहेत. पाईपलाईन व ड्रेनेज लाईनचे काम झाल्यानंतर सिमेंट कॉंक्रीट करून पॅच मारण्यात आले आहेत. यानंतर काही ठिकाणी पाण्याची कनेक्शन व ड्रेनेजची कनेक्शन घेण्यासाठी पुन्हा खोदाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान १४ मार्चला महापालिकेत प्रशासक नेमण्यात आला आहे. यानंतर मात्र भाजपचे महापालिकेतील महापालिकेतील माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करू लागल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.
आज भाजपचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे (Pramod Kondhre)
यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने,
माजी नगरसेवक अजय खेडेकर (Ajay Khedekar) यांच्यासह अन्य पदाधिकारी देखिल उपस्थित होते.
यावेळी पावसाळापुर्वी झाडांची छाटणी, ड्रेनेज लाईनची सफाई, बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

कामे मध्यवर्ती भागात परंतू त्रास शहरातील नागरिकांना
शहराची मध्यवर्ती बाजार पेठ आणि शाळा, महाविद्यालयांमुळे शहरातील सर्वच भागातील नागरिक, नोकरदार, व्यावसायीक, विद्यार्थी मध्यवर्ती शहरात येतात.
त्यामुळे बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्ता हे कायमच गजबजलेले असतात.
या रस्त्यांवर एकाच वेळी कामे करण्यात आल्याने रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.
नियोजनाच्या अभावामुळे या रस्त्यांवरून जाणार्‍या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

Web Title :- Pune PMC News | It is time to agitate for civic amenities on Kasba BJP, which has held the most powerful positions in the Municipal Corporation in 5 years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Management | ‘या’ 5 टिप्स केल्या फॉलो, तर उन्हाळ्याच्या हंगामात सुद्धा कंट्रोल राहील डायबिटीज!

 

Breast Cysts | जाणून घ्या काय आहेत ‘ब्रेस्ट सिस्ट’ची 4 लक्षणे आणि उपचार

 

Workouts For Depression | डिप्रेशनची लक्षणे कमी करू शकतात 4 परिणामकारक वर्कआऊट, जाणून घ्या कोणती