Corporator Vasant More | पुणे मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी; समर्थक कार्यकर्त्यांमध्ये ‘खदखद’, जाणून घ्या नेमकं काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Corporator Vasant More | मशिदीवरील भोंगे हटविण्यावरून ‘मनसे’ मध्ये सुरू असलेल्या वादातुन आज शहराध्यक्ष वसंत मोरे (Corporator Vasant More) यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याजागी पालिकेतील माजी गटनेते आणि मोरे यांचे कट्टर समर्थक साईनाथ बाबर (MNS Sainath Babar) यांची नियुक्ती करत मोरे यांना ‘कात्रज’चा (Katraj) घाट दाखवला. गुढी पाडव्याला (MNS Gudi Padwa Melava Mumbai) मुंबईत झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने मशिदीवरील भोंगे चार दिवसांत हटवावेत. अन्यथा मनसे च्या वतीने मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा ईशारा दिला होता.

 

यावर दोन दिवसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष वसंत मोरे (Corporator Vasant More) यांनी त्यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार नाही. माझ्या प्रभागात मुस्लिम बांधवांचे कायमच सहकार्य राहिले असून प्रभागात अशांतता वाढेल असे कृत्य करणे माझ्या मनाला पटणार नाही असे स्पष्टीकरण दिले होते.

 

वसंत मोरे यांच्या या भूमिकेला शहरातील पदाधिकाऱ्यांनी लागलीच विरोध केला. पक्ष प्रमुखांची भुमिका हीच पक्षाची भुमिका असल्याचे मत व्यक्त करत, वसंत मोरे यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते. तर राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध म्हणून मनसे मध्ये विविध आघाड्यांमध्ये काम करणाऱ्या मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. पक्षातील या दुफळीतून आज शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेत वस्तुस्थिती मांडली.

यामध्ये वसंत मोरे यांना सोबत घेण्यात आले नव्हते. तत्पूर्वी सकाळी मनसेच्या सर्वच व्हाट्सॲप ग्रुपमधून वसंत मोरे लेफ्ट झाले होते. यावरून मुंबई भेटीत मोरे यांच्याबाबत काहीतरी निर्णय घेतला जाणार याचेही सूतोवाच मिळत होते. मोरे यांच्या जागी बाबर यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय झाला होता. साईनाथ बाबर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका आरती बाबर या देखील यावेळी उपस्थित होत्या, यावरूनच स्पष्ट होत आहे.

 

दरम्यान , वसंत मोरे कात्रज परिसरातून सलग तीनवेळा मनसे कडून निवडुन आले आहेत.
मनसे च्या इंजिनवर सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले मोरे हे पुण्यातील एकमेव नगरसेवक आहेत.
मोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात कात्रज मध्ये मोठ्याप्रमाणावर विकास कामे केली आहेत.
तीन वेळा प्रभाग रचना बदलली तरी या परिसरातील जनतेने मोरे यांच्यावर विश्वास दाखविला.
सर्व जातीधर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन 24 तास राबणारा कार्यकर्ता म्हणून मोरे यांना कात्रजकरांनी साथ दिली.
परंतु ‘ मशिदीवरील भोंग्या’ वरून आज पक्षानेच त्यांना कात्रजचा घाट दाखविल्याने मोरे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये खदखद व्यक्त होत आहे.

 

 

Web Title :- Corporator Vasant More | MNS Corporator Vasant More Katraj Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा