Costa Titch Passes Away | दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक कोस्टा टिच याचे कॉन्सर्टदरम्यान निधन; वयाच्या 27 व्या वर्षी झाले निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Costa Titch Passes Away | दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय गायक रॅपर कोस्टा टिच याचे कॉन्सर्ट दरम्यानच निधन झाले. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. कोस्टा टिच यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर त्याचा अखेरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. (Costa Titch Passes Away)

https://twitter.com/nwanyebinladen/status/1634691259129364481

कोस्टा टिच हा जोहान्सबर्ग येथील अष्टमी म्युझिकल फेस्टिवल मध्ये परफॉर्म करत होता. या दरम्यानच तो गाणे गात असताना अचानकच स्टेजवर कोसळला. यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला सावरले आणि पुन्हा उभे केले मात्र तो पुन्हा दुसऱ्यांदा खाली कोसळला. सध्या त्याच्या या अशा अचानक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (Costa Titch Passes Away)

कोस्टा टिचचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील नेलस्प्रूट येथे 1995 साली झाला. कोस्टा टीच याचे खरे नाव कोस्टा त्सोबानोग्लू मात्र त्याला कोस्टा टीच या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली. त्याचे ‘अ‍ॅक्टिवेट’ आणि ‘नकलकथा’ ही चांगलीच लोकप्रिय झालेली गाणी आहेत. नुकतेच त्याचे रिमिक्स गाणे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. कोस्टा टिचला डान्सची खूपच आवड होती त्यामुळे वयाच्या 15 व्या वर्षापासून त्याने डान्स मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि जोहान्सबर्ग येथील ‘न्यू एज स्टीझ’ या डान्स ग्रुप मध्ये त्यांनी दाखल होत अनेक आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मात्र त्यानंतर त्याला संगीताची गोडी लागली आणि संगीत विश्‍वात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करायला सुरुवात केली.

 

Web Title :- Costa Titch Passes Away | south africa rapper costa titch passes away on stage know about costa titch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

Mango Eating Tips | आंबे खाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा फायद्यांऐवजी होऊ शकते नुकसान

Kamlakar Nadkarni Passed Away | ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि लेखक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन