Ileana D’Cruz | इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? समोर आले ‘हे’ कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम : अभिनेत्री इलियाना डिक्रुझने (Ileana D’Cruz) आज दाक्षिणात्य चित्रपटा बरोबरच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाच्या ठसे उमटवले आहेत. अभिनेत्री नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाज मुळे चर्चेत असते. मात्र आता ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतून इलियानाला (Ileana D’Cruz) बॅन केल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता याबाबतचे खरे सत्य समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इलियानाने एका तमिळ चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेतली होती. मात्र तिने त्या चित्रपटात काम केले नाही. तिच्या अशा वागण्यामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर निर्मात्याने निर्माता परिषदकडे याची तक्रार केली. निर्मात्याच्या तक्रारीची दखल घेत इलियानाला कोणत्याही चित्रपटासाठी साईन न करण्याचा निर्णय घेऊन तिला बॅन केले असे बोलले जात आहे. मात्र यात किती तथ्य आहे याचा खुलासा अद्याप तरी झालेला नाही.

जेव्हा या संपूर्ण गोष्टीची सत्यता जाणून घेण्यासाठी तमिळ फिल्म प्रोड्यूसर्स काऊन्सीलशी चर्चा करण्यात आली.
तेव्हा हा अहवाल पूर्णपणे चुकीचा असल्याचे समोर आले आहे.
TFPC कडून अशी कोणतीही बंदी इलियानावर (Ileana D’Cruz) घालण्यात आलेली नाही असे
TFPC यांनी सांगितले आहे. यामुळे या चर्चेत कोणतीही सत्यता नसून हे केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. इलियाना ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करत इलियानाचे बॉलिवूडमध्ये देखील अनेक चाहते वर्ग आहेत. गेली तीन ते चार वर्ष ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसली नाही. 2018 मध्ये रवी तेजाच्या ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटात शेवटची दिसली होती.

Web Title : Ileana D’Cruz | know the truth behind ileana dcruz gets banned from tamil film industry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Madhuri Dixit | अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Beed Crime News | 5 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह; नेमके काय आहे प्रकरण?

Pune Crime News | बसस्टॉपवर मैत्रिणीचा घेतला कीस; लग्न केले नाही तर जीव देण्याची दिली धमकी

Jalna Crime News | मरणानंतरही साथ सोडली नाही; पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या 5 तासांनी पतीनेदेखील सोडले प्राण

Jalna Accident News | लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्ध पती-पत्नींचा अपघातात मृत्यू; मुलीची भेट राहिली अपूर्ण