माजी उपमहापौर दीपक मानकरांना ‘सशर्त’ जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर दीपक मानकर यांना मोक्का प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला आहे. जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणात मागील दीड वर्षापासून मानकर पुण्यातील येरवडा तुरुंगात आहेत.

दीपक मानकर यांच्याकडे अनेक वर्षे काम करणाऱ्या जितेंद्र जगताप यांनी 2 जून 2018 मध्ये घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांना अटक करण्यात आली. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून आत्महत्येला मानकरच जाबाबदार असल्याचे लिहलं होतं. त्यानंतर मानकर यांना अटक झाली होती. अटक करताना पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोक्का लावला होता. त्याविरोधात मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने मोक्का प्रकरणात जामीन दिला आहे.

२ जून रोजी जितेंद्र जगताप यांनी घोरपडी येथे रेल्वेखाली आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जगताप यांनी मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी आणि अन्य काहींची नावं लिहलेली होती. आपल्या आत्महत्येसाठी हे सर्व जबाबदार असल्याचे जगताप यांनी म्हटलं होतं. या आधारे पोलिसांनी मानकर आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली होती.

Visit : Policenama.com