Video : लग्नापुर्वीचे फोटोशुट भोवले ; Kiss करताना झाले असे काही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रीवेडिंग फोटोशुटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. प्रीवेडिंग फोटोशुट करताना हे कपल नदीत पडल्याचा हा व्हिडीओ आहे. प्रीवेडिंग शुट करण्यासाठी कपल्स महिनोंमहिने आधी तयारी करतात. शिवाय फोटोशुट आणखी अविस्मरणीय करण्यासाठी छानशा ठिकाणी जात असतात.

केरळ मधील एक कपल आहे जे फोटोशुट करताना नदीत पडले आहे. तुम्ही व्हिडीओ कधीच विसरू शकणार नाहीत. एक कपल फोटोशुट करण्यासाठी एका होडीत बसले आहे. यानंतर ते फोटो काढत असताना नदीत नाव उलटते आणि नवरा-नवरी दोघेही नदीत पडतात. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील तिरुवल्लाचे रहिवासी तिजिन थंकचेन आणि चंगनचेरी येथील रहिवास सिल्पा यांचे 6 मे रोजी लग्न होणार आहे. हे दोघांनी आपल्या लग्नासाठी पठानमिथिट्टा जिल्ह्यातील कदमनटिट्टा येथील पंबा नदीमध्ये फोटो केले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, फोटोशुट करताना त्यांनी डोक्यावर केळाचे पान घेतले आहे. त्यानंतर लगेच फोटोग्राफर त्यांना किस करण्यास सांगत आहे. दोघेही किस करण्यासाठी जसे जवळ आले तेव्हा ते ज्या होडीत बसले होते. ती होडी उलटली आणि ते दोघेही पाण्यात पडले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांहू अधिक लोकांनी पाहिले आहे.