धक्कादायक ! पोटच्या 6 दिवसाच्या बाळाला पालकांनीच 3.6 लाखांना विकलं, 6 जणांना अटक

पोलीसनामा ऑनलाइन – गरीबीमुळे एका जोडप्याने पोटच्या 6 दिवसाच्या मुलाला (6-day child) 3 लाख 60 हजारांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील ( Delhi) फतेहपूरबेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ज्यावेळी आईला मुलाची (newborn) आठवण आली त्यावेळी तिने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. खरेदीदार जोडपे मुलाला (newborn) बिहारमध्ये घेऊन जात होते. त्यावेळी यूपी पोलिसांच्या (UP Police) मदतीने कानपूर रेल्वे स्थानकावर त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी मुलाचे पालक, दोन खरेदीदार आणि अन्य दोघे असे सहा जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद कुमार आणि त्यांची पत्नी पूजा देवी हे मूळचे बिहारचे राहणारे असून सध्या ते आयानगरमध्ये राहतात. या जोडप्यानी आपल्या 6 दिवसांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार केली होती. गोविंदकुमारने त्याचा मित्र हरिपाल सिंगने मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले होते. मात्र पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. 8 जूनला मुलाचा जन्म झाला होता आणि त्याच्या पालकांनी 15 जूनला तक्रार दिली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना एकाला ताब्यात घेतले होते.

यात गोविंद कुमार आणि त्याच्या पत्नीने रमण यादव यांच्या नातेवाईकाला मुलाला विकल्याचे उघड झाले. रमण यादवचे नातेवाईक विद्यानंद आणि रामपरी यादव यांच्या लग्नाला 25 वर्ष होऊनही मूल होत नसल्याने त्यांनी रमन यादव यांना मुल खरेदीबद्दल सांगितले होते. रमण यादव यांनी हरिपालला सांगितले होते.

ज्यावेळी सौदा झाला तेंव्हा मुलाचा जन्मही झाला नव्हता.
मात्र मुलगा असेल तर ते 3 लाख 60 हजाराला विकत घेण्याचा सौदा झाला होता.
गुरुग्रामच्या एका हॉस्पिटलमध्ये पूजाने 8 जून रोजी मुलाला जन्म दिला.
10 जूनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.
यासाठी विद्यानंदने बिहारमधील आपली जमीन विकली होती.
मुलाच्या पालकांनी 12 जून रोजी मुलाला विद्यानंद आणि त्याची पत्नीला दिल्याचे तपासात समोर आले आहे.

हे देखील वाचा

 

पिंपरीमध्ये पान टपरीत विकला जात होता गांजा; चालकाला पकडून 823 ग्रॅम गांजा जप्त

 

Mumbai Police Property Cell । विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेलाआतापर्यंत 50 वेळा अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : couple sells newborn for rs 3 6 lakh in delhi 6 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update