‘कोर्ट मॅरेज’नंतर ‘लव्हर्स’वर केला अंदाधुंद गोळीबार, एकाच चितेवर दोघांचे पार्थिव ठेऊन जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबमधील नौशहरा ढाला गावात रविवारी एका प्रेमी जोडप्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोघांनीही कोर्ट मॅरेज केले होते. मात्र त्यानंतर संतापलेल्या मुलीच्या घरच्यांनी दोघांची गोळ्या घालत हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा नोंदविला असून घटनेच्या 3 दिवसांनंतर देखील पोलिसांना एकाही आरोपीचा तपास लागलेला नाही.

मात्र हत्येनंतर  अमनदीप सिंह आणि अमनप्रीत कौर या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या गावी नौशहरा ढाला  नेण्यात आले आहेत. त्यांचे मृतदेह पाहताच त्यांच्या कुटुंबातली सगळ्यांनाच रडू कोसळले. दोघांचेही मृतदेह एकाच चितेवर ठेवण्यात आले होते. दोघांच्याही मृतदेहाला अग्नी मुलाच्या वडिलांनी दिला. त्यावेळी मुलाचे वडील सुखदेव सिंह आणि मुलीचे वडील अमरजीत सिंह यांना मोठ्या प्रमाणात रडू कोसळले. त्यामुळे गावकऱ्यांचे देखील डोळे पाणावले. पोलिसांनी या प्रकरणी गुरभिंदर सिंह, करनैल सिंह, हरविंदर सिंह, सरवन सिंह आणि अमरजीत सिंह या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी येथील पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक  अजय कुमार यांना या पदावरून हटवून या घटनेच्या चौकशीची जबाबदारी नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरणजीत सिंह यांच्याकडे सोपवली आहे. या दोघांनी जवळपास वर्षभरापूर्वी लग्न केले होते. मात्र मुलीच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे मुलीचे वडील, काका आणि भाऊ हे दोघानांही इजा पोहोचवण्याचा तयारीत होते.

दोघांच्या घरच्यांची या लग्नावर सहमती देखील झाली होती. मात्र त्यानंतर रविवारी तो आपल्या पत्नीसह गुरुद्वारामध्ये गेला होता.  आपल्या पत्नीसह गाडीवरून परतत असताना मुलीचा चुलत भाऊ गुरपिंदर सिंह याने त्यांच्या गाडीला टक्कर मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसह दोघांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यामुळे दोघांचे ऑस्ट्रेलियाला जाण्याचे स्वप्न देखील धुळीस मिळाले.

visit : Policenama.com