COVID-19 : ‘कोरोना’च्या भीतीनं मुलांना घेऊन अमेरिकेला गेली ‘बेबी डॉल’ सनी ! म्हणाली- ‘माझी मुलं…’

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोना दिवसेंदिवस वाढणारा कहर पाहून बॉलिवूड स्टार सनी लिओनी पती डॅनियल आणि तीन मुलांसह लॉस एंजेलिसला गेली आहे. तिचं म्हणणं आहे की, इथं मुलं जास्त सुरक्षित आहेत. सनीनं अमेरिकेतील आपल्या घराच्या गार्डनमधून एक फोटो शेअर केला आहे. यात मुलगी निशा आणि दोन्ही मुलं नोह आणि अशर दिसत आहेत.

अमेरिकेला जाण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना सनीनं इंस्टारून एक पोस्ट शेअर केली आहे. सनीनं लिहिलं की, “सर्व आयांना माझ्याकडून हॅप्पी मदर्स डे. मी आणि माझ्या पतीकडे अशी संधी होती आम्ही आमच्या मुलांना अशा ठिकाणी जावं जिथं या अदृश्य दुश्मन कोरोना व्हायरस पासून जास्त सुरक्षित राहतील. आमच्या लॉस एंजेलिसमधील दुसऱ्या घराच आमचं सिक्रेट गार्डन. माझ्या आईला मिस करते. हॅप्पी मदर्स डे.”

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.