Covid-19 : CDC चा दावा, बंद ठिकाणी 6 फुटांच्या अंतरापर्यंत पसरू शकतो ‘कोरोना’, 4 प्रकारे करू शकता बचाव

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाही. चीनमधून निघालेल्या या धोकादायक व्हायरसने 35,702,309 लोक संक्रमित झाले आहेत आणि 1,045,955 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील तमाम आरोग्य तज्ज्ञांनंतर आता यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने सुद्धा मान्य केले आहे की कोरोना व्हायरस हवेद्वारे पसरू शकतो.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, संस्थेचे म्हणणे आहे की, काही तासांसाठी का होईना परंतु व्हायरस हवेतून पसरू शकतो. आपल्या नव्या दिशा-निर्देशानुसार सीडीसीने म्हटले की, कोरोनाने पीडित लोक संभाव्य दुसर्‍यांना 6 फुटापेक्षा जास्त अंतरावरून सुद्धा संक्रमित करू शकतात. रूग्णाद्वारे तयार होणारा छोट्या कणाची मात्रा व्हायरसला पसरवण्यास पुरेशी असते.

सीडीसीने नेहमीच हवेतून पसरणार्‍या छोट्या कणांच्या माध्यमातून संसर्गाचा इशारा दिला आहे. याच कारणामुळे दिशा-निर्देशात सहा फुटांच्या सामाजिक अंतराचा नियम बनवण्यात आला आहे.

अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या एका गटाने मेडिकल जर्नल सायन्समध्ये प्रकाशित एका खुल्या पत्रात इशारा दिला आहे की, हवेत लिरोसेरिंग करणारे एयरोसोल्स कोविड-19 ट्रान्समिशनचे एक मुख्य स्त्रोत असू शकतात.

बंद ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका
याच वर्षी जुलैमध्ये जगभरातील शास्त्रज्ञांनी दावा केला होता की, कोरोना व्हायरस हवेतून सुद्धा पसरू शकतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, शिंकणे, खोकणे किंवा जोराने बोलल्याने संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून निघालेले सूक्ष्म कण कार्यालय, घर, शॉपिंग मॉल आणि हॉस्पीटलच्या हवेत खुपवेळपर्यंत राहातात, या हवेच्या संपर्कात येणारे लोक संक्रमित होऊ शकतात.

घरात सुद्धा घाला मास्क
जर खरोखरच कोरोना व्हायरसचा प्रसार हवेतून होत असेल तर खराब व्हेंटिलेशन आणि गर्दीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी मोठी पावले उचलावी लागतील. यापासून बचाव करण्यासाठी घरात सुद्धा सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे जरूरी आहे.

डॉक्टरांना लावावा लागेल एन-95 मास्क
शास्त्रज्ञांनी म्हटले की, मेडिकल स्टाफला एन-95 मास्कची आवश्यकता आहे. अशाप्रकारचे मास्क कोरोना व्हायरस रूग्णाशी बोलणे, खोकणे आणि शिंकण्यातून निघणार्‍या छोट्या श्वसनकणांना सुद्धा रोखतात.

सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन सिस्टम आवश्यक
त्यांनी सूचवले की, शाळा, नर्सिंग होम, घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी व्होंटिलेशन सिस्टमच्या ठिकाणी संसर्ग कमी करण्यासाठी चांगले नवे फिल्टर लावण्याची आवश्यकता आहे. छोट्या कणांमध्ये घराच्या आत तरंगणार्‍या व्हायरल कणांना मारण्यासाठी नील किरणांची आवश्यकता असू शकते.

भारतात कोरोनाची प्रकरणे 66 लाखांच्या पुढे
भारतात मागील 24 तासात कोरोनाची 61,267 नवी प्रकरणे समोर आली आहेत. सोबतच या कालावधीत 884 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी अपडेटनुसार आता एकुण संक्रमितांची संख्या देशात 66,85,083 झाली आहे.