Covid-19 Effects | कोरोना संसर्गानंतर ऐकण्याची क्षमतावर होतोय परिणाम? एक्सपर्टकडून जाणून घ्या याची लक्षणे

नवी दिल्ली : वृत्त संस्थाकोरोना व्हायरस संसर्गातून (Covid-19 Effects) बरे झालेले अनेक लोक विविध प्रकारच्या आजारांना बळी पडत आहेत. यापैकी काही आजार तर जीवघेणे आहेत तर काही असे आहेत ज्यामध्ये जीव वाचतो पण सामान्य जीवन जगण्यालायक तुम्ही रहात नाही. म्युकोरमायकोसिस mucormycosis (ब्लॅक फंगस-black fungus) सारख्या संसर्गानंतर अनेक लोक असे आहेत ज्यांना पोस्ट कोविड बहिरेपणाची (Covid-19 Effects) समस्या होत आहे.

दिल्लीतील ENT (कान, नाक आणि घसा) तज्ज्ञ डॉक्टर जे एम हंस यांनी एका हिंदी चॅनलला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या सामान्य रूग्णाला वायरल संसर्ग होतो तेव्हा त्याचा सर्वप्रथम परिणाम त्याच्या शरीराच्या ईएनटीवर पडतो. अलिकडेच दिसून आले आहे की, मोठ्या संख्येने कोविड संसर्गातून बरे झालेले रूग्ण ऐकण्याची समस्या घेऊन येत आहेत.

सोबतच काही रूग्ण असेही आहेत, ज्यांना व्हर्टिगोची समस्या आहे. कोरोना संसर्गाच्या दरम्यान इन्फेक्शन नाकाच्या माध्यमातून येते. जर ते कानातून गेले तर वायरल इन्फेक्शनमुळे रिअ‍ॅक्शन होते. यामुळे कानाच्या पेशींचे नुकसान होते. नंतर ऐकण्याची शक्ती प्रभावित होते.

कसे ओळखाल आजाराला

रूग्णाला ऐकण्यात अडचण येणे किंवा कानात शिटीसारखा आवाज ऐकू येणे ही सामान्य लक्षणे आहेत.

तसेच कान जड झाल्यासारखे जाणवतात.

ही काही अशी लक्षणे आहेत, जी याकडे इशारा करतात की रूग्णात इन्फेक्शनचा स्तर वाढत आहे आणि ऐकण्याची शक्ती कमी होत आहे.

अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा. पोस्ट कोविड समस्यांवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे.

Web Title : Covid-19 Effects | post covid effects ent explains hearing loss after corona virus infection

Aloe Vera farming | 50,000 रूपयात सुरू करा आपला स्वत:चा बिजनेस,
5 लाखापर्यंत होईल मोठा नफा; जाणून घ्या काय करावे लागेल?

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

RBI New Rules | आरबीआयने Personal Loan च्या नियमात केले अनेक बदल, जाणून घ्या आता किती घेऊ शकता कर्ज

JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी,
पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या