Covid-19 : मागील 24 तासात सापडले कोरोनाचे 48786 नवीन रूग्ण, कालच्या तुलनेत 6% जास्त प्रकरणे

नवी दिल्ली : Covid-19 in india | देशभरात मागील 24 तासात कोरोनाचे (Covid-19 in India) 48786 नवीन रूग्ण सापडले. हे बुधवारच्या तुलनेत 6 टक्के जास्त आहेत. तर या दरम्यान 988 रूग्णांचा मृत्यू झाला. भारतात अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 5,23,257 आहे. म्हणून या हिशेबाने सध्या देशात एकुण कोरोना केसच्या तुलनेत अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या अवघी 1.72 टक्के आहे. मागील 24 तासादरम्यान 61 588 रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले. हा लागोपाठ 49वा दिवस आहे जेव्हा बरे होणार्‍या रूग्णांची संख्या संक्रमितांच्या तुलनेत जास्त आहेत. बरे होणार्‍या रूग्णांचा दर सध्या 96.97 टक्के आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास थांबली आहे. या गोष्टीचा संकेत सतत कमी होत असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटवरून मिळत आहे. या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 2.54 टक्के होता. कोणत्याही देशात 5 टक्केपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट खुप चांगला मानला जातो. या दरम्यान आतापर्यंत देशभरारत 33.57 कोटी लोकांना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या 9771 केस

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,771 नवीन प्रकरणे समोर आली. तर या दरम्यान 141 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यात संक्रमितांची एकुण संख्या 60,61,404 वर पोहचली आहे.

या महामारीने मरणार्‍यांची एकुण संख्या राज्यात वाढून 1,21,945 झाली आहे. मागील 24 तासात 10,353 रूग्ण संसर्गातून बरे झाले आहेत, ज्यामुळे राज्यात संसर्गातून मुक्त होणार्‍या लोकांची संख्या वाढून 58,19,901 झाली आहे.

  केरळ
– नवीन रूग्ण 13,658
– मृत्यू 142

 आंध प्रदेश
– नवीन रूग्ण 3,797
– मृत्यू 35

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau | अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोनं आपल्याच माजी प्रमुख IPS जी.पी. सिंह यांच्या ठिकाणांवर टाकले छापे

Gopichand Padalkar। ‘घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आलीय’

Gulshan Kumar Murder Case | गुलशन कुमार हत्याकांड प्रकरणात हायकोर्टाचा 24 वर्षानंतर मोठा निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : covid 19 in india cases in india in last 24 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update