‘कोरोना’चा रिपोर्ट नेगेटिव्ह तरीसुद्धा लंग्ज इन्फेक्शन, तुमच्यात सुद्धा नाहीत ना कोविड-19 ची ‘ही’ लक्षणं ?, जाणून घ्या

जयपूर : वृत्त संस्था – राजस्थानमध्ये आता कोरोना सायलेंट अटॅक करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये येथे लंग्ज इन्फेक्शनची प्रकरणे 4 टक्केपर्यंत वाढली आहेत. एकट्या जयपुरमध्ये आतापर्यंत 9 पेक्षा जास्त रूग्ण समोर आले आहेत, ज्यांचा कोरोना रिपोर्ट प्रत्येकवेळी निगेटिव्ह येतो, परंतु लंग्जमध्ये आतल्या आत संसर्ग आहे.

यासंदर्भातील वृत्तात टीव्ही 9 ने म्हटले आहे की, काही डॉक्टर्सशी चर्चा केली असता त्यांचेही म्हणणे आहे की, कोरोना रिपोर्ट नेगटिव्ह असूनही लोकांना फुफ्फुसाचा संसर्ग होत आहे. डॉक्टर सुधीर भंडारी यांनी सांगितले की, आता सीटी स्कॅन करणार्‍या रूग्णांमध्ये 65 टक्केपेक्षा जास्त रूग्णांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन आढळले आहे.

ही सुद्धा आता कोरोनाची लक्षणे
अगोदर खोकला, ताप आणि सर्दी ही कोविडची लक्षणे समजली जात होती, परंतु आता श्वास घेण्यास त्रास, कमजोरी, थकवा आणि वेदना मुख्य लक्षणे झाली आहेत. राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये अनेक रूग्णांना निमोनिया झाला आणि लंग्ज इंफेक्शन वेगाने पसरत आहे.

एक्सपर्ट डॉक्टरचे म्हणणे आहे की, ज्या आरटी पीसीआर टेस्ट होत आहेत, त्यांचा 60 ते 70 टक्के रिझल्ट येत आहे. तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यानंतर सुद्धा थकवा, वेदना, कमजोरी किंवा चव न येणे असे होत असेल तर दुर्लक्ष करू नका. लवकरात लीवकर सीटी स्कॅन किंवा एक्स रे करा. यातून फुफ्फुसांचे इन्फेक्शन समजू शकते.

एसएमएस मेडिकल कॉलेजचे प्रिंसिपल डॉक्टर सुधीर भंडारी यांनी सांगितले की, आरटी पीसीआर टेस्ट होत आहेत, त्यांचा 60 ते 70 रिझल्ट योग्य येत आहे, तर चेस्टच्या सिटी स्कॅनचा रिपोर्ट 98 टक्केपर्यंतच योग्य आहे, जे सुद्धा कोविड रूग्ण आहेत. यासाठी केवळ आरटी पीसीआरवर अवलंबून राहू नये. सध्या राजस्थानात 50 टक्केपेक्षा जास्त केस अशा येत आहेत, ज्यांना ताप, खोकला नसतानाही थकवा, वेदना, कमजोरी आणि तोंडाची चव बिघडण्याची समस्या होत आहे.

राजस्थानच्या कोविड-19 डेडिकेटेड सरकारी हॉस्पीटलमध्ये काम करणारे निवासी डॉक्टर अभिषेक यादव यांनी सांगितले की, आता ऑगस्ट महिन्यानंतर असे रूग्ण वाढत आहेत, ज्यांच्या लंग्जमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त इन्फेक्शन होत आहे. यासाठी आता ऑक्सीजनची मागणीसुद्धा हॉस्पीटलमध्ये वाढली आहे.