Covid-19 Vaccination Certificate On Whatsapp | काही सेकंदात पाहिजे असेल कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र, तर केवळ WhatsApp वर लिहा Certificate…

नवी दिल्ली : Covid-19 Vaccination Certificate On Whatsapp | देशात कोरोना व्हॅक्सीन (Covid Vaccine) चे सुमारे 133 कोटी डोस देण्यात आले आहेत आणि दररोज हा आकडा वाढत आहे. सरकारचे लक्ष्य आहे की कोरोनापासून बचावासाठी सर्वांना व्हॅक्सीन घ्यावी. (Covid-19 Vaccination Certificate On Whatsapp)

 

अनेक ठिकाणांवर कोरोना लसीकरण प्रमाणपत्र (Covid-19 Vaccination Certificate) पाहिल्या नंतर प्रवेश दिला जातो. ज्यांनी व्हॅक्सीन घेतलेली नाही अशा लोकांना रोखले जाते. परंतु काही लोक अशावेळी अस्वस्थ होतात, जेव्हा त्यांच्याकडे व्हॅक्सीनचे प्रमाणपत्र मागितले जाते. त्यांनी व्हॅक्सीनचा डोस घेतला आहे, परंतु त्यांच्याकडे ताबडतोब लसीकरण प्रमाणपत्र नसते.

 

एका मेसेजमध्ये मिळवा लसीकरण प्रमाणपत्र

अशावेळी जर तुम्ही व्हॅक्सीनचा एक किंवा दोन डोस घेतले असतील तर सहजपणे लसीकरण प्रमाणपत्र मिळवू शकता. तुम्ही काही सेकंदात आपल्या मोबाईलवर लसीकरण प्रमाणपत्र मिळवू शकता.

 

विशेषता प्रवासादरम्यान कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची गरज असते. तुम्ही काही संकेदात कोविड-19 चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्या मोबाईमध्ये 9013151515 नंबर सेव्ह करा. यानंतर या नंबरवर WhatsApp मध्ये Certificate टाईप करून पाठवा तुम्हाला ताबडते PDF मध्ये लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त होईल.

 

लोकांना लसीकरण प्रमाणपत्र सहज उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकारने ही सुरूवात केली आहे.
सरकारची फॅक्ट चेक एजन्सी PibFactcheck ने सुद्धा यास दुजोरा दिला आहे.

 

Web Title :- Covid-19 Vaccination Certificate On Whatsapp | covid 19 vaccination certificate on whatsapp message

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा